---Advertisement---

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अर्धशतकासह ‘या’ विक्रमात मितालीचा ‘राज’, बनली जगातील पहिलीच महिला क्रिकेटर

Mithali-Raj
---Advertisement---

शनिवार रोजी (१९ मार्च) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (INDW vs AUSW) महिला संघात आयसीसी महिला वनडे विश्वचषक २०२२ चा (ICC Women ODI World Cup 2022) १८ वा सामना झाला. ऑकलँडच्या ईडन पार्क मैदानावर झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद २७७ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ३ चेंडू शिल्लक असतानाच ४ विकेट्सच्या नुकसानावर भारताचे लक्ष्य पूर्ण केले आणि ६ विकेट्स बाकी असताना सामना खिशात घातला. या सामन्यादरम्यान भारताकडून मिताली राज (Mithali Raj) हिने अर्धशतकी खेळी केली. या खेळीसह तिने मोठ्या विक्रमालाही गवसणी घातली आहे.

मिताली महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा ५० पेक्षा जास्त धावा करणारी फलंदाज (Most 50 Plus Scores In ODI) बनली आहे. तिने ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना ९६ चेंडूंमध्ये १ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने ६८ धावा केल्या होत्या. ही तिची वनडे कारकिर्दीत ५० पेक्षा जास्त धावा करण्याची ७० वी वेळ होती. 

मितालीनंतर या विक्रमाच्या यादीत इंग्लंडची महिला फलंदाज चार्लोट एडवर्ड्स हिचा क्रमांक लागतो. तिने ५५ वेळा हा पराक्रम केला आहे. तर वेस्ट इंडिजची कर्णधार स्टिफनी टेलर हिने वनडे क्रिकेटमध्ये ४४ वेळा ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. 

दरम्यान सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, भारतीय महिलांनी फलंदाजीत शानदार प्रदर्शन केले, मात्र गोलंदाजांना आव्हानाचा बचाव करण्यात अपयश आल्याने भारतीय संघाला हा सामना गमवावा लागला. भारताकडून फलंदाजी करताना कर्णधार मितालीसह यस्तिका भाटिया आणि हरमनप्रीत कौर यांनीही अर्धशतके केली होती. यस्तिकाने ६ चौकारांच्या मदतीने ५९ धावा केल्या होत्या. तर हरमनप्रीतनेही नाबाद ५७ धावा केल्या होत्या.

प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाकडून मेग लॅनिंग हिचे शतक केवळ ३ धावांनी हुकले. ती १३ चौकारांच्या मदतीने ९७ धावा करून बाद झाली. तर यष्टीरक्षक एलिसा हिली हिने ७२ धावा जोडल्या. तसेच सलामीवीर रिचेल हायनेस हिनेही ४३ धावांचे योगदान दिले. याव्यतिरिक्त शेवटच्या षटकात बेथ मूनी हिनेही २० चेंडूंमध्ये ताबडतोब ३० धावांची खेळी केल्यामुळे ऑस्ट्रेलियाने ४९.३ षटकातच हा सामना जिंकला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘आता आमच्याकडे चहल आणि अश्विन आहे’, राजस्थान रॉयल्सच्या प्रमुख सदस्याने भरली हुंकार

मोठी बातमी.! जय शाहांचा कार्यकाळ १ वर्षाने वाढवला, तर ‘या’ तारखेपासून श्रीलंकेत सुरु होणार ‘आशिया चषक’

महिला विश्वचषक: भारताला नमवत ऑस्ट्रेलियाचा सलग ५वा विजय, मिताली अन् कंपनीचा सेमीफायनचा मार्ग कठीण

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---