---Advertisement---

मितालीचे पुन्हा वनडे क्रिकेटमध्ये ‘राज’; कारकिर्दीत आठव्यांदा केली ‘अशी’ कामगिरी

On: मंगळवार, जुलै 6, 2021 5:38 PM
MIthali Raj
---Advertisement---

इंग्लंडविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत शानदार कामगिरी करण्याचा फायदा भारतीय महिला वनडे क्रिकेट संघाच्या कर्णधार मिताली राजला मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) जाहीर झालेल्या ताज्या महिला वनडे फलंदाजी क्रमवारीत मितालीने पुन्हा एकदा अव्वल स्थान गाठले. मिताली तिच्या कारकीर्दीत एप्रिल २००५ मध्ये पहिल्यांदा वनडे क्रमवारीत प्रथम क्रमांकावर पोहोचली होती.

मितालीशिवाय स्मृती मंधाना अव्वल दहामध्ये असणारी भारताची एकमेव फलंदाज आहे.  एका स्थानाच्या नुकसानीसह ती सातव्या क्रमांकावर घसरली.

आपल्या २२ वर्षांच्या कारकीर्दीत मिताली आठव्यांदा वनडे क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचली. महिला क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात सर्वाधिक धावा करणाऱ्या मितालीने इंग्लंडविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत १०३.०० च्या सरासरीने २०६ धावा केल्या. ती या मालिकेत सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांमध्ये पहिल्या क्रमांकावर राहिली. या कामगिरीच्या जोरावर तिने महिलांच्या वनडे फलंदाजांच्या क्रमवारीत चार स्थानांची झेप घेतली.

इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी मिताली आठव्या क्रमांकावर होती. परंतु, आपल्या अप्रतिम फलंदाजीमुळे ती पुन्हा पहिल्या स्थानावर विराजमान झाली.

या खेळाडूंना देखील झाला फायदा
मिताली व्यतिरिक्त शेफाली वर्मा ४९ स्थानांची झेप घेत ७१ व्या स्थानावर पोहोचली. अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी ही पाचव्या स्थानी कायम आहे. तिच्या व्यतिरिक्त लेगस्पिनर पूनम यादव ही अव्वल दहा गोलंदांजांमध्ये असणारी दुसरी भारतीय महिला गोलंदाज असून तिने आपले नववे स्थान कायम राखले. गोलंदाजांच्या क्रमवारीत अष्टपैलू दीप्ती शर्मा एक स्थान सुधारून १२ व्या स्थानावर आली.

महिला वनडे क्रमवारीतील अव्वल ५ फलंदाज-
मिताली राज- भारत
लिझे ली- दक्षिण आफ्रिका
एलिसा हिली- ऑस्ट्रेलिया
टॅमी ब्यूमॉन्ट- इंग्लंड
स्टेफनी टेलर- वेस्ट इंडीज

महिला वन-डे क्रमवारीतील अव्वल ५ गोलंदाज-
जेस जॉन्सन- ऑस्ट्रेलिया
मेगन शूट- ऑस्ट्रेलिया
मरिझाने काप- दक्षिण आफ्रिका
शबनीम इस्माईल- दक्षिण आफ्रिका
झुलन गोस्वामी- भारत

महत्त्वाच्या बातम्या – 

पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी इंग्लंडने बदलला संपूर्ण संघ, तब्बल ९ खेळाडू करू शकतात पदार्पण

यजमान इंग्लंड की पाहुणा भारत, कोण मारणार कसोटी मालिकेत बाजी? ऑस्ट्रेलियन दिग्गजाने दिले ‘हे’ उत्तर

आठ स्पर्धांच्या आयोजनासाठी आयसीसीकडे आल्यात तब्बल १७ देशांच्या निविदा, भारताने ‘या’ स्पर्धांवर केला दावा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---