एखादी जादू व्हावी आणि कोरोना व त्याचे सर्व प्रकार नाहीसे व्हावेत, असे सर्वांनाच वाटते. मात्र, सध्याच्या परिस्थितीत ते काही शक्य असल्याचे दिसत नाही. कोरोनाप्रमाणेच माणूस आयुष्यात इतर अनेक अडचणींच्यावेळी जादूची अपेक्षा करतो. त्यातही आर्थिक अडचणींच्या वेळी तर ही अपेक्षा वाढते, परंतू ही अपेक्षा नेहमी स्वप्नच राहते. मात्र, महाराष्ट्रातील एका खेड्यातील गरीब विद्यार्थी रिया हिचे हे स्वप्न पूर्ण झाले आहे.
रिया कानवडे (Riya Kanwade) ही महाराष्ट्राच्या संगमनेर तालुक्यातील निमगाव पाडा येथील गरिब कुटुंबातील मुलगी. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने तिला श्रीलंका येथे होणाऱ्या जादूच्या प्रयोग स्पर्धेत सहभागी होता येणे शक्य नव्हते. अंगात असलेल्या जादूच्या प्रयोगांचे कौशल्य वापरुन आर्थिक परिस्थिती सुधारावी, असे स्वप्न कदाचित तिने पाहिले असावे. आणि तिचे हेच स्वप्न सत्यातही उतरले आहे. (magic experiment competition)
जागरुक लोकप्रतिनिधी या नात्याने पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके (MLA Nilesh Lanke) यांनी रिया कानवडेला आर्थिक मदत केली आहे. आमदार लंके यांना जेव्हा रियाच्या परिस्थितीबद्दल समजले तेव्हाच त्यांनी तिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. कुठल्याही सामान्य माणसाला आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी एखादी जादू व्हावी, तसेच हे सर्व घडले आहे. त्यामुळे आता रिया कानवडे हिचे श्रीलंकेला जाण्याचे आणि जादूच्या स्पर्धेत सहभागी होण्याचे स्वप्न आता साकार होणार आहे. (MLA Nilesh Lanke help Riya Kanwade from Nimgaon Pada village in Sangamner)
हेही वाचा – दोन वेळेस विश्वचषक उंचावला, पण मानाच्या रणजी ट्रॉफीत विजयापासून वंचित राहिलेले २ भारतीय शिलेदार
आमदार निलेश लंके यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली आहे. तसेच रुपये ५१ हजारांची मदत रियाला केली असल्याचेही सांगितले आहे.
केवळ आर्थिक परिस्थितीमुळे एका बाल कलाकाराची संधी वाया जाऊ नये, या जबाबदारी व कर्तव्याची जाणीव ठेवून मी माझ्या पारनेर-नगर मतदारसंघा शेजारील संगमनेर तालुक्यातील निमगाव पागा या गावातील एक बाल कलाकार pic.twitter.com/IVS2qYjamE
— Nilesh Lanke – निलेश लंके (@Nilesh_LankeMLA) January 10, 2022
आमदार निलेश लंके (MLA Nilesh Lanke) यांनी फेसबुक पोस्टवर याबाबत अधिक माहिती दिली आहे. ‘केवळ आर्थिक परिस्थितीमुळे एका बाल कलाकाराची संधी वाया जाऊ नये, या जबाबदारीची, कर्तव्याची जाणीव ठेवून सामाजिक बांधिलकी जपत मी माझ्या पारनेर-नगर मतदारसंघाच्या शेजारील संगमनेर तालुक्यातील निमगाव पागा या गावातील एक बाल कलाकार कु.रिया भागवत कानवडे हीची श्रीलंका येथे होणाऱ्या जादूच्या प्रयोग स्पर्धेसाठी भारतातून बाल जादुगार म्हणून निवड झाली.रियाला स्पर्धेसाठी शुभेच्छा देऊन, तिच्या श्रीलंका स्पर्धेसाठी लागणाऱ्या प्रवास खर्चासाठी पालकांकडे रुपये ५१,००० चा निधी सुपूर्द केला!’ असे त्यांनी लिहिले आहे.
त्यामुळे आता रिया श्रीलंकेत जाऊन देशाचे आणि संगमनेर तालुक्याचे नाव नक्कीच गाजवेल अशी आशा बाळगूयात. तसेच, तिच्या जादूच्या प्रयोगाने प्रेक्षक मंत्रमुग्ध होतील अशीच अपेक्षा ठेवूयात.
अधिक वाचा –
- है तय्यार हम! अंडर-१९ विश्वचषकाच्या पहिल्या सराव सामन्यात यंग इंडियाची यजमान विंडीजवर दणदणीत मात
- आयपीएल २०२२: हार्दिकच्या खांद्यावर अहमदाबादच्या नेतृत्वाची जबाबदारी? हे दोन टी२० स्पेशालिस्ट देणार साथ?
- विराटने पत्रकार परिषदेत सांगितला धोनीने दिलेला ‘तो’ सल्ला, म्हटला ‘आयुष्यभर लक्षात ठेवलाय’