---Advertisement---

मोईन अलीचा मॅजिक बॉल, बॅट- पॅडच्या मधून जात चेंडूने उडवल्या यष्ट्या; खुद्द विराटही पाहातच राहिला

On: बुधवार, मे 4, 2022 10:59 PM
Moeen-Ali-Virat-Kohli
---Advertisement---

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा फलंदाज विराट कोहली चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध चांगल्या सुरुवातीनंतर पुन्हा एकदा मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला. मागील सामन्यात अर्धशतक करणारा विराट ऑफ स्पिनर मोईन अली याच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. चेंडू त्याच्या बॅट आणि पॅडमधून जात सरळ यष्ट्यांना जाऊन धडकला. विराटने मोईनच्या गोलंदाजीवर बाद होण्याची ही बारावी वेळ होती. 

पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर झालेल्या या आयपीएल २०२२मधील ४९व्या सामन्यात विराट ३३ चेंडूत ३० धावा करून बाद झाला. या खेळीदरम्यान त्याने १ षटकार आणि ३ चौकारही मारले. मात्र मोईनपुढे त्याचा टिकाव लागला नाही.

डावातील दहावे षटक टाकण्यासाठी आलेल्या मोईनच्या शेवटच्या चेंडूवर विराट त्रिफळाचीत झाला. चेंडू गुडलेंथवर टप्पा खाल्ल्यानंतर आत आला आणि विराट चेंडूला क्रॉसमध्ये हिट करण्यापासून चुकला. परिणामी चेंडूने थेट यष्ट्या उडवल्या.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

विराट नेहमीच ठरलाय मोईनचं गिऱ्हाईक
मोईनने विराटची विकेट काढण्याची ही बारावी वेळ होती. कसोटी क्रिकेटबद्दल बोलायचे झाल्यास, मोईनने विराटला आतापर्यंत ३९३ चेंडू फेकताना १९६ धावा देत ६ वेळा बाद केले आहे. वनडे क्रिकेटबद्दल सांगायचे झाल्यास, मोईनने ११५ चेंडू फेकताना ८९ धावा देत विराटला ३ वेळा तंबूत धाडले आहे. टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हे प्रमाण थोडे कमी आहे. मोईनच्या १० चेंडूंचा सामना करताना विराटने २ षटकारांच्या मदतीने २१ धावा केल्या आहेत आणि तो फक्त १ वेळा बाद झाला आहे. तर आयपीएलमध्ये मोईनचा शिकार ठरण्याची ही विराटची दुसरी वेळ आहे.

बेंगलोरकडून चेन्नईला १७४ धावांचे आव्हान
बेंगलोरच्या डावाबद्दल बोलायचे झाल्यास, महिपाल लोमरोरने सर्वाधिक ४२ धावा केल्या. त्याने २७ चेंडू खेळताना २ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने या धावा फटकावल्या. त्याच्याव्यतिरिक्त फाफ डू प्लेसिसने ३८ व विराटने ३० धावांचे योगदान दिले. तसेच दिनेश कार्तिकने शेवटच्या षटकात नाबाद २६ धावांचे योगदान दिले आणि बेंगलोरने धावफलकावर १७३ धावा लावल्या.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

सीएसकेची वाढली डोकेदुखी! कॅच घेण्याच्या नादात जडेजाने स्वत:लाच केले जखमी, मैदानावर लागला विव्हळू

वाईट झालं! विराटला नाही आवरला धाव चोरण्याचा मोह अन् धोनीने बुलेटच्या वेगाने मॅक्सवेलला केले रनआऊट

पहिल्याच षटकात घडला ड्रामा, चौधरीने विराटला फेकून मारला चेंडू; मग काय झालं पाहाच

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---