इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सच्या निवृत्तीनंतर क्रिकेट विश्वातून अनेक धक्कादायक विधाने पुढे येत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे व्यस्त वेळापत्रक याच कारणास्तव त्याने निवृत्ती घेतल्याचे कारण सांगितले होते. त्याच्यानंतर अनेक आजीमाजी खेळाडूंनी वनडे क्रिकेटचे भवितव्य धोक्यात आले आहे, असे मत व्यक्त केले. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने वनडे क्रिकेटचे महत्व कायम राहणार असे स्पष्ट केले होते. अशातच इंग्लंडच्या आणखी एका दिग्गजाने वनडे क्रिकेटबाबत आश्चर्यकारक प्रतिक्रिया दिली आहे.
इंग्लंड संघाचा दिग्गज फिरकीपटू मोईन अली (Moeen Ali) याने म्हटले, “पुढील ३-४ वर्षांमध्ये कोणीच वनडे क्रिकेट खेळणार नाही. तसेच वनडे क्रिकेटला आणखी रोमांचक करण्यासाठी काही नियमांमध्ये बदल करावा लागणार आहे.”
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचा दिग्गज वसीम अक्रम (wasim akram) आणि ऑस्ट्रेलियाचा फलंदाजी उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) यांनीही वनडे क्रिकेट धोक्यात आले आहे असे म्हटले होते. ‘लोकांचा या क्रिकेट प्रकारातील रस कमी होत आहे’, असेही मत त्यांनी मांडले होते. तर भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्र अश्विन यानेही वनडे क्रिकेटबद्दल म्हटले, “वनडे क्रिकेटला त्याचे महत्व टिकून ठेवण्यासाठी काही पर्याय शोधणे गरजेचे आहे. कारण ते दिवसेंदिवस टी२० क्रिकेटसारखे होत आहे.”
वनडे क्रिकेट बंद होईल किंवा ते कोणीही खेळणार नाही अशी चर्चा होत असताना भारताच्या माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी काही मार्ग सुचविले आहेत. ते म्हणाले, “वनडे क्रिकेट ५० ऐवजी ४० षटकांचे करा.” हाच सल्ला पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद अफ्रिदी यानेही दिला होता.
काही वर्षांत वनडे क्रिकेट खेळणे बंद होईल – मोईन अली
Cricket365 शी बोलताना मोईन म्हणाला, “माझ्या मते लोक ५० षटाकच्या सामन्यांमध्ये सर्वाधिक रस घेत नाहीये. चाहत्याना टी२० आणि कसोटी सर्वाधिक आवडत आहे. अशातच वनडेकडे दुर्लक्ष झाले आहे. तसेच तो क्रिकेट प्रकार बोरिंग पण झाला आहे. त्यावरून तुम्ही काही करूही शकत नाही.”
मोईनने २०१४मध्ये वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करताना १२१ सामन्यात २०२३ धावा करताना ९४ विकेट्सही घेतल्या आहेत. तसेच मागील वर्षीच त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO। हॉकीचे मैदान गाजवणाऱ्या महिला संघाला मेन्स हॉकी टीमने दिला विशेष सन्मान
‘…म्हणून मला टी२० आणि कसोटी संघात घेत नाहीत!’, संघनिवडीवरून आता थेट शिखर धवनने सोडले मौन