---Advertisement---

Video: लाईव्ह कार्यक्रमात भिडले ॲलिस्टर कूक आणि मोईन अली; त्यानंतर जे झाले ते पाहा

On: गुरूवार, जानेवारी 6, 2022 5:49 PM
Alister Cook and Moeen Ali
---Advertisement---

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (England vs India) या दोन्ही संघांमध्ये सिडनी क्रिकेट ग्राउंडवर (Sydney cricket ground) चौथा कसोटी सामना सुरू आहे. ५ कसोटी सामन्यांच्या या मालिकेत इंग्लंड संघ ३-० ने पिछाडीवर आहे. मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघ विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान, मोईन अली (Moeen Ali) आणि इंग्लंडचा माजी कर्णधार ॲलिस्टर कूक (Alastair Cook) यांच्यात वाद रंगल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हे दोघेही दिग्गज क्रिकेटपटू बीटी स्पोर्ट्ससाठी ऍशेस मालिकेत क्रिकेट तज्ञ म्हणून काम करत आहे. या शो दरम्यान दोघांमध्ये वाद रंगल्याचे पाहायला मिळाले आहे. याची सुरुवात एका मस्करीने झाली होती. इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक विलगिकरणात असल्यामुळे जो रूट सिडनी कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी संघातील खेळाडूंना मदत करताना दिसून आला होता, तर ॲलिस्टर कूकने आपल्या खेळाडूंना कधीच अशी मदत केली नव्हती. हेच कारण होते की, दोन्ही खेळाडूंमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू झाली.

जो रूट (Joe Root) बद्दल बोलताना मोईन अलीने म्हटले की, “कर्णधार म्हणून जो रूट खेळाडूंसोबत भावनिकरित्या जोडला गेला आहे. तो खेळाडूंसोबत अधिक वेळ घालवत असतो.” यावर ॲलिस्टर कूकने प्रश्न विचारला की, ‘तू माझ्यावर टीका करतोय का?’ यावर उत्तर देत मोईन अली म्हणाला की, “होय, तुम्ही असं म्हणू शकता, कूकच्या नेतृत्वाखाली मी चांगली गोलंदाजी केली. तर जो रूटच्या नेतृत्वाखाली माझ्या गोलंदाजीत सुधारणा झाली.” (Moeen ali ugly fight with Alastair Cook watch video)

यावर कूकने म्हटले की, “मला हे म्हणावं लागेल की, मी मोईन अलीला कधीच संघाबाहेर केलं नाही. तो माझ्यावर टीका करू शकतो. परंतु, मोईन तू मला सांगू शकतो का, मी तुला किती वेळा संघाबाहेर केले? कूकने म्हटल्यानंतर मोईन अली भडकला आणि म्हणाला की, “तुझं बोलणं बरोबर आहे. परंतु, तू आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द सुरू झाल्यापासून मला १ ते ९ क्रमांकापर्यंत फलंदाजीला पाठवलं आहे.” याचे उत्तर देत ॲलिस्टर कूक म्हणाला की, “मी संघात तुझी योग्य भूमिका शोधण्याचा प्रयत्न करत होतो.”

महत्वाच्या बातम्या –

झुलन गोस्वामीच्या भूमीकेत अनुष्का शर्माचा जलवा! ‘चकदा एक्सप्रेस’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

पंतशी पंगा, मग होणार दंगा! एडेन मार्करमच्या स्लेजिंगला रिषभचे सडेतोड उत्तर, पाहा व्हिडिओ

हे नक्की पाहा :

क्रिकेटमधील डक अन् त्याचे प्रकार | Explanation Of Duck In Cricket And Its Type

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---