---Advertisement---

प्रशिक्षक मॅक्युलमसाठी कसोटीमध्ये पुनरागमन करणार इंग्लंडचे ‘हे’ दोन दिग्गज खेळाडू

On: सोमवार, मे 30, 2022 9:43 AM
---Advertisement---

इंग्लंड संघाचा दिग्गज मोईन अली लवकरच त्यांच्या कसोटी संघात पुनरागमन करण्याची शक्यता आहे. मोईनने इंग्लंडचा मुख्य प्रशिक्षक ब्रँडन मॅक्युलमला सांगितले आहे की, तो कसोटी क्रिकेटमधील निवृत्ताचा निर्णय माघारी घेऊ इच्छितो. मोईन आता बेन स्टोक्सच्या नेतृत्वाता संघात सहभागी होण्याच्या तयारीत आहे.

मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात मोईन अली (Moeen Ali) याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला होता. निवृत्तीची घोषणा करताना त्याने असी माहिती दिली होती की, त्याला येणाऱ्या काळाता मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये लक्ष केंद्रित करायचे आहे आणि यासाठी तो हा निर्णय घेत आहे. पण आता आयपीएलचा हंगाम अपेक्षेप्रमाणे न गेल्यानंतर त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमनाचा निर्णय घेतला असण्याची शक्यता आहे.

आयपीएल २०२२ मध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी खेळताना मोईन अली फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये अपयशी ठरताना दिसला. अशात आता तो कसोटी क्रिकेटकडे पुन्हा वळताना दिसत आहे. माध्यमांतील वृत्तानुसार इंग्लंडचा फिरकी गोलंदाज आदिल राशीदला देखील निवृत्तीतून माघार घ्यायला सांगितले जाऊ शकते. राशीद देखील इंग्लंडसाठी कसोटी क्रिकेट खेळत नाही.

मोईन अलीसाठी कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणे सोपी बाब आहे, कारण इंग्लंड संघाला सध्या चांगल्या कसोटी खेळाडूंची आवश्यकता आहे. ब्रँडन मॅक्युलम (Brendon McCullum) नुकताच काही दिवसांपूर्वी संघाचा मुख्य प्रशिक्षक बनला आहे आणि त्याच्यावर संघाला फॉर्ममध्ये आणण्याची जबाबदारी सोपबली गेली आहे.

माहितीनुसार मॅक्युलम कसोटी संघात जोस बटलर, लियाम लिविंगस्टोन यांच्यासह मोईन अली आणि आदिल राशीद यांना संघात सहभागी करू इच्छितो. या खेळाडूंना घेतल्यानंतर संघ भक्कम होईल यात शंका नाही. मोईनने त्याचा कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत ६४ सामने खेळले आणि यामध्ये १९५ विकेट्स, तर २९१४ धावा केल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---