इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने पहिल्या टी२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला आणि अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावले. मोईनच्या बॅटचे हे अर्धशतक इंग्लंडचे टी२० मध्ये सर्वात जलद अर्धशतक आहे. अशा प्रकारे, मोईनने २०२१ साली पाकिस्तानविरुद्ध अवघ्या १७ चेंडूंमध्ये ही कामगिरी करणाऱ्या लियाम लिव्हिंगस्टनचा विक्रम मोडला.
टी२० मध्ये सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम युवराज सिंगच्या नावावर आहे. युवराजने २००७ मध्ये इंग्लंडविरुद्ध डर्बनमध्ये अवघ्या १२ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. मोईन अलीने १८ चेंडूत २ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ५२ धावांची तुफानी खेळी केली. मोईनशिवाय जॉनी बेअरस्टोने ५३ चेंडूंत ३ चौकार आणि ८ षटकारांसह ९० धावा केल्या. दोघांनी चौथ्या विकेटसाठी अवघ्या ३७ चेंडूत १०६ धावांची शानदार भागीदारी केली.
16 balls 😅
Scorecard/clips: https://t.co/PAcXkPJJwc
🏴 #ENGvSA 🇿🇦 @IGcom pic.twitter.com/cWO3obtoGx
— England Cricket (@englandcricket) July 27, 2022
यादरम्यान, दोन्ही फलंदाजांनी १७व्या षटकात अँडिले फेहलुकवायोचा जोरदार मारा केला. अंडीलच्या या षटकात मोईनने ३ तर बेअरस्टोने २ षटकार खेचले आणि एकूण ३३ धावा केल्या. मोईन आणि बेअरस्टोच्या झंझावाती फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने २० षटकांत ६ गडी गमावून २३६ धावांपर्यंत मजल मारली
दरम्यान, इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या टी२० सामन्यात इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला धूळ चारत भारताकडून मिळालेल्या निराशाजनक पराभवानंतर आपल्या नावाला साजेशी प्रतिमा उभारण्याचा प्रयत्न केला आहे. या सामन्यात विजय मिळवून सध्या टी२० मालिकेत इंग्लंड १-०ने आघाडीवर आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जखम दिलेली भारताने आता इंग्लंडने आफ्रिकेविरुद्ध चोळलाय मलम! पहिल्या टी२०त मिळवला तुफानी विजय
आणखी एका विश्वचषकाचे यजमानपद भुषवण्यासाठी भारत सज्ज, गांगुलींनी सांगितलं ‘कधी होणार वर्ल्डकप?’
‘तो परत आलाय’! सहा वर्षानंतर ‘हा’ टी२० स्पेशालिस्ट दक्षिण आफ्रिका संघात; गाजवलेला २०१५ वर्ल्डकप