इंग्लंडचा दिग्गज क्रिकेटपटू आणि भारतीय कर्णधार विराट कोहलीसाठी अनेकदा अडचण ठरणारा मोईन अली याने अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीमध्ये विराटला अनेकदा बाद केले आहे. त्याच्या या अचानक निवृत्तीच्या निर्णयामुळे चाहते चकित झाले आहेत.
मोईनने त्याचा शेवटचा कसोटी सामना भारताविरुद्ध काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या कसोटी मालिकेत खेळला होता. तो इंग्लंड आणि भारत यांच्यातील २ सप्टेंबर ते ६ सप्टेंबर यादरम्यान झालेल्या ओव्हल कसोटी सामन्यात सहभागी झाला होता. मोईन त्याच्या टी२० आणि एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीवर अधिक लक्ष्य केंद्रित करू इच्छित आहे. या पार्श्वभूमीवर त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. तो आतापर्यंत इंग्लंडसाठी ६४ कसोटी सामने खेळला आहे आणि यामध्ये त्याचे प्रदर्शन चांगेले राहिले आहे.
6⃣4⃣ Test matches
1⃣9⃣5⃣ wickets
2⃣9⃣1⃣4⃣ runs
Countless memories ❤️#ThankYouMo 👏— England Cricket (@englandcricket) September 27, 2021
मोईन अलीने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराटला १० वेळा बाद केले
मोईनचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय कर्णधार विराट कोहलीविरुद्धचे आतापर्यंतचे प्रदर्शन अप्रतिम राहिले आहे. त्याने विराटला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत १० वेळा बाद केले आहे. मोईनच्या फिरकीसमोर विराट चांगली खेळी करण्यासाठी अनेकदा अपयशी ठरला आहे.
कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा बाद करणारे फिरकी गोलंदाज
१० – मोइन अली
९ – आदिल रशीद
८ – ग्रीम स्वान
७ – ऍडम झम्पा
७ – नाथन लियाॅन
मोईनच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयानंतर सर्वनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. तो यावर्षी डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या ऍशेज मालिकेमध्ये इंग्लंडसाठी महत्वाचा खेळाडू मानला जात होता. मात्र, त्याच्या या निर्णयानंतर चाहते निराश झाले आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडसाठी आतापर्यंत २,९१४ धावा केल्या आहेत आणि १९५ विकेट्सही मिळवल्या आहेत. त्याने त्याच्या निवृत्तीच्या निर्णयाची कल्पना इंग्लंडचा कर्णधार जो रूट, मुख्य प्रशिक्षक क्रिस सिल्वरवुड आणि निवडकर्त्यांना मागच्याच आठवड्यात दिली होती. तो आता भविष्यात मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करणार आहे.
मोईनची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द
मोईनने त्याच्या कसोटी क्रिकेटमधील पदार्पण सामना लाॅर्ड्सच्या ऐतिहासिक स्टेडियमवर २०१४ मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. २०१४ नंतर आतापर्यंत तो इंग्लंडसाठी ६४ कसोटी सामने खेळला आहे. यादरम्यान १११ डावांत त्याने २८.२९ च्या सरासरीने २९१४ धावा केल्या आहेत, यामध्ये त्याच्या ५ शतकांचा आणि १४ अर्धशतकांचा समावेश आहे. गोलंदाजीमध्ये त्याने ३६.६६ च्या सरासरीने १९५ विकेट्स घेतल्या आहेत. मोईनने १३ वेळा ४ आणि पाच ५ वेळा ५ वेकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. कसोटी क्रिकेटव्यतिरिक्त त्याने ११२ एकदिवसीय आणि ३८ टी२० आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले आहेत.
मोईन आयपीएलमध्ये एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज संघाचा प्रमुख परदेशी खेळाडू आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
हॅट्रिक पूर्ण करताच हर्षल मैदानावर सुसाट धावत सुटला, आरसीबीचा ‘विजयी क्षण’ एकदा पाहाच
ॲक्शनला रिॲक्शन! षटकार मारल्यानंतर खुन्नस देणाऱ्या भरतची विकेट घेऊन चाहरने केला असा जल्लोष