मार्च ४, २०२२ चा दिवस आणि भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील मोहाली (Mohali Test) येथे सुरू असलेला पहिला कसोटी सामना (first Test), भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिला जाणार आहे. कारण या दिवशी क्रिकेटजगतातील दिग्गज फलंदाजांपैकी एक असलेला विराट कोहली (Virat Kohli) त्याचा १०० वा कसोटी सामना (Virat Kohli’s 100th Test) खेळण्यासाठी मैदानावर उतरला आहे. यावेळी भारतीय क्रिकेट प्रेक्षक त्याला चीयर करत (Crowd Cheering Virat Kohli) त्याला प्रोत्साहन देताना दिसले.
भारतात क्रिकेटला अनन्यसाधारण महत्त्व आहे. इथे क्रिकेटप्रेमींकडून प्रतिभाशाली क्रिकेटपटूंना भरपूर प्रेम आणि स्नेह मिळाले आहे. कोविड-१९ मुळे हल्ली विनाप्रेक्षक क्रिकेट सामने खेळवले जात आहेत. परंतु विराटच्या १०० व्या कसोटी सामन्यासाठी मात्र बीसीसीआयने मोहालीतील आसन क्षमतेच्या ५० टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला आहे (allow 50 percent crowd). त्यामुळे या ऐतिहासिक सामन्यासाठी उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी विराटच्या मैदानावर प्रवेश करतानाच्या क्षणाला अजूनच खास बनवले.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने ८० धावांवर त्यांची सलामी जोडी गमावली. त्यामुळे विराट त्याच्या चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला. हातात बॅट, डोक्यावर हेल्मेट घालून विराट फलंदाजीसाठी मैदानात जात असताना स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांनी विराट.. विराट.. विराट.. असे नारे लगावत त्याला चीयर केले. तो मैदानावर पोहोचल्यानंतरही काही मिनिटे ही शेरेबाजी सुरू होती.
https://www.instagram.com/p/Caq7M3gjwqD/?utm_source=ig_web_copy_link
Mohali crowd roaring "Kohli, Kohli, Kohli".https://t.co/6PW6SaSyMn
— Johns. (@CricCrazyJohns) March 4, 2022
यापूर्वी २००२ मध्ये असाच काहीसा क्षण भारतीय क्रिकेटमध्ये आला होता. त्यावेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) लिड्स येथे इंग्लंडविरुद्ध कारकिर्दीतील १०० वी कसोटी खेळण्यासाठी उतरला होता. त्यावेळी भारतीय क्रिकेटप्रेमींनी आवर्जुन लिड्सच्या स्टेडियममध्ये हजेरी लावली होती आणि सचिन फलंदाजीसाठी मैदानावर उतरताना त्यालाही सचिन.. सचिन.. सचिन.. असे म्हणत प्रेक्षकांनी चीयर केले होते.
दरम्यान विराटपूर्वी भारताकडून ११ खेळाडूंनी १०० कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, कपिल देव, सचिन तेंडूलकर, अनिल कुंबळे, राहुल द्रविड, सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण, विरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग, इशांत शर्मा यांचा समावेश आहे. यांच्यानंतर विराट भारताकडून कसोटी सामन्यांची शंभरी करणारा १२ वा खेळाडू बनला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
रोहित वयाच्या ३४ व्या वर्षी बनला कसोटी कर्णधार, या विक्रमात कुंबळेनंतर दुसरा क्रमांक
विराटची १०० वी कसोटी: ‘रनमशीन’ कोहलीच्या नावावर आहेत ‘हे’ १० मोठे विक्रम