भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी सामन्यात भारताचा खेळाडू अष्टपैलू रविंद्र जडेजा याने शानदार शतक झळकावले. एकीकडे प्रमुख भारतीय फलंदाज खेळपट्टीवर स्थिरावल्यावर मोठी धावसंख्या उभारण्यात, अर्धशतक-शतक साजरे करण्यात अपयशी ठरत असताना रविंद्र जडेजाने संयमी फलंदाजी करत शतक साकारले. (Mohali Test Ravindra Jadeja Hits Century)
पंजाबच्या मोहाली (Mohali Test) क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका (Ind v SL) यांच्यात पहिला कसोटी सामना सुरु असून सामन्याच्या पहिल्याच डावात भारताने भक्कम धावसंख्या उभारली. भारताच्या सर्वच फलंदाजांनी धावांमध्ये योगदान दिले. परंतू, रविंद्र जडेजाने शतकीय खेळी करत संघाच्या धावसंख्येला खरा आकार दिला. (Ravindra Jadeja Hits Century)
💯@imjadeja brings up his 2nd Test CENTURY 👏👏.
Live – https://t.co/XaUgORcj5O #INDvSL @Paytm pic.twitter.com/L4rYFhWLlM
— BCCI (@BCCI) March 5, 2022
ठरला दुसराच भारतीय….
जडेजाने १६८ धावांत शतक पूर्ण केले. ज्यात १० खणखणीत चौकारांचाही समावेश आहे. एम्बुलडेनियाच्या षटकात एकेरी धावसंख्या घेत रविंद्र जडेजाने आपले विक्रमी शतक पूर्ण केले. या शतकासह जडेजा हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५००० धावा करणारा आणि ४०० विकेट घेणारा जगातील दुसरा भारतीय खेळाडू बनला आहे. यापूर्वी कपील देव यांनी हि कामगिरी केली आहे.
Jadeja completed 5000 International runs.
5000 runs + 400 wickets for India
-Kapil Dev
-Ravindra Jadeja*— The Cricket Panda (@TheCricketPanda) March 5, 2022
जडेजाची नजरेत भरणारी कसोटी कारकिर्द…
श्रीलंकेविरुद्ध जडेजाने केलेले शतक त्याच्या कसोटी कारकिर्दीतील दुसरे कसोटी शतक ठरले. यासह त्याने १७ अर्धशतक झळकावले आहेत. एकूण ५८ कसोटीत जडेजाने २ शतक, १७ अर्धशतकांसह २ हजार ३०० हून अधिक धावा केल्या आहेत. तर २३२ कसोटी बळी देखील जडेेजाच्या नावावर आहेत.
हेही वाचा – रवींद्र जडेजाचा ‘पुष्पा’ फिव्हर काही कमी होईना; विकेट घेताच केले ‘मैं झुकेगा नहीं’ स्टाईलमध्ये सेलिब्रेशन
सर जडेजाचं शतक आणि हटके सेलिब्रेशन…
रविंद्र जडेजा याने लंकेविरुद्ध शतक झळकावल्यानंतर सर्वाधिक चर्चा झाली ती त्याच्या हटके सेलिब्रेशनची. जडेजा हा तसा मुळ राजपूत. त्यामुळे राजपूत समाजाची शान असलेल्या तलवारबाजीला जडेजाने मैदानावर दाखवले.
'Rockstar' @imjadeja 👏👏@Paytm #INDvSL pic.twitter.com/JG25othE56
— BCCI (@BCCI) March 5, 2022
शतक पूर्ण होताच रविंद्र जडेजाने हातातील बॅट तलवारीसारखी फिरवत सर्वांनाच चकित केले. त्याचा हा सेलिब्रेशनचा व्हिडिओ तूफान व्हायरल होतोय.
अधिक वाचा :
रिषभ ९६ धावांवर बाद होताच गावसकर, धोनी यांच्या ‘या’ विक्रमांशी झाली बरोबरी
“शंभराव्या कसोटीची कॅप माझ्या बालपणीच्या हिरोकडून मिळणं ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट”