इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या द हंड्रेड क्रिकेट लीगच्या १७ व्या सामन्यात चौकार आणि षटकारांचा जोरदार पाऊस पडलेला पाहायला मिळाला आहे. लॉर्ड्सच्या मैदानावर लंडन स्पिरीट आणि नॉर्दर्न सुपर चार्जर्स यांच्यात खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात डेव्हिड विलीचे असे वादळ आले आहे की, त्यामध्ये मोहम्मद आमीरच्या गोलंदाजीची वाताहात झाली.
लंडन स्पिरिटचा एकही गोलंदाज विलीला त्रास देऊ शकला नाही आणि विलीने एकामागून एक लांब- लांब हवेत षटकार मारून चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. नॉर्दर्न सुपर चार्जर्स संघाकडून ४५ चेंडूमध्ये ८१ धावांच्या वादळी खेळीत विलीने ३ चौकार आणि ६ षटकार मारले आहेत.
विली चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि पहिल्याच चेंडूवर चौकारासह आपल्या डावाची सुरुवात केली होती. मात्र, विलीचे रौद्र रुप डावाच्या शेवटच्या पाच चेंडूंमध्ये दिसले. मोहम्मद अमीरने टाकलेल्या शेवटच्या पाच चेंडूत विलीने दोन षटकारांसह १५ धावा केल्या आहेत.
शेवटच्या पाच चेंडूंमध्ये विलीने आमीरला दोन लांब षटकार मारले. विलीच्या आक्रमणासमोर अमीर पूर्णपणे असहाय्य दिसला होता. आमीरने आपल्या २० चेंडूंमध्ये ४० धावा दिल्या.
😲 @david_willey smashed 81* from 45 balls!
A real captain's innings!#TheHundred pic.twitter.com/fOGKHy8p7I
— The Hundred (@thehundred) August 3, 2021
विलीच्या आक्रमणामुळे सुपर चार्जर्स संघाने १०० चेंडूत ३ बाद १५५ धावा केल्या. प्रतिउत्तरादाखल लंडन स्पिरिट संघाला १०० चेंडूत ९ बाद ९२ धावाच करता आल्या. त्यांच्याकडून केवळ ओएन मॉर्गन(२७) आणि लुईस रिस(२४) यांनाच २० धावांचा टप्पा ओलांडता आला. सुपर चार्जर्स संघाकडून बेन रेनने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० विश्वचषकानंतर वेस्ट इंडिजचा हा ‘चॅम्पियन’ क्रिकेटर घेणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
जिगरबाज! भर मैदानात होऊ लागल्या उलट्या, तरीही ‘या’ गोलंदाजाने पूर्ण केलेले षटक
Video: पंतच्या हट्ट ठरला टीम इंडीयासाठी फायदेशीर, डीआरएससाठी विराटला समजवल्याने मिळाली मोठी विकेट