Mohammad Amir IPL 2026: पाकिस्तान क्रिकेट संघाचा खेळाडू मोहम्मद अमीरने आयपीएलबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. आमिरने सांगितले आहे की त्याला इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळायचे आहे. एका वृत्तानुसार, आमिरने सांगितले की तो 2026 पर्यंत आयपीएलमध्ये खेळण्याची आशा बाळगतो. आमिर पाकिस्तान सोडून दुसऱ्या देशाचे नागरिकत्व मिळविण्याचा प्रयत्न करत आहे.
आमिर हा पाकिस्तानचा एक घातक गोलंदाज आहे. त्याने अनेक वेळा संघासाठी दमदार कामगिरी केली आहे. पण आता त्याला आयपीएलमध्ये खेळायचे आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलमधून बंदी घातली आहे. आयपीएलमधील फिक्सिंग प्रकरणानंतर हे पाऊल उचलण्यात आले. ‘इंडियन एक्सप्रेस’मधील एका वृत्तानुसार, आमिर म्हणाला, “पुढील वर्षी मला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळू शकते. जर तसे झाले तर मी आयपीएलमध्ये खेळेन. (MOHAMMAD AMIR IN IPL)
खरंतर, मोहम्मद आमिरची पत्नी नर्गिस ही यूकेची नागरिक आहे. मोहम्मद आमिरनेही यूके नागरिकत्वासाठी अर्ज केला आहे. जर त्याला नागरिकत्व मिळाले तर तो पाकिस्तान सोडून जाईल. अशा परिस्थितीत तो नियमांनुसार आयपीएलमध्ये खेळू शकतो. आमिर म्हणाला, “पाकिस्तानी क्रिकेटपटूंना आयपीएलमधून बंदी घालण्यात आली आहे. पण आपले माजी क्रिकेटपटू आयपीएलमध्ये समालोचन करतात. अश्या परिस्थितीत त्याचे आयपीएल खेळण्याचे स्वप्न पूर्ण हेईल का? हे अत्ताच सांगणे योग्य ठरणार नाही.
🚨 MOHAMMAD AMIR IN IPL. 🚨
– Amir confirms he’ll be eligible to play in the IPL from 2026. pic.twitter.com/9B677YUvow
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 8, 2025
मोहम्मद आमिरची चमकदार कामगिरी आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. त्याने पाकिस्तानसाठी 62 टी20 सामन्यांमध्ये 71 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 61 एकदिवसीय सामन्यांमध्ये 81 विकेट्स घेतल्या आहेत. आमिरने 36 कसोटी सामनेही खेळले आहेत. त्याने या फॉरमॅटमध्ये 118 विकेट्स घेतल्या आहेत. आमिरने कसोटी सामन्यात 751 धावाही केल्या आहेत. आमिरने पाकिस्तान प्रीमियर लीगमध्येही चांगली कामगिरी केली आहे.
हेही वाचा-
CT 2025: टीम इंडियाचा ‘ब्रह्मास्त्र’ फायनलमध्ये न्यूझीलंडसाठी घातक ठरणार?
रोहित शर्मा इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर, साधणार धोनीच्या या विक्रमाशी बरोबरी!
Women’s Day: ऑलिंपिकमध्ये भारतीय महिलांची दैदिप्यमान कामगिरी, पाहा जिद्द, मेहनत आणि विजयाची कहाणी!