India vs New Zealand Champions Trophy 2025-: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ चांगली कामगिरी करत आहे. संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये अद्याप एकही सामना गमावलेला नाही. भारतीय संघ चालू स्पर्धेत अपराजित आहे. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियासारख्या मोठ्या संघांना हरवून भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता जेतेपद जिंकण्यासाठी भारतीय संघ 9 मार्च रोजी अंतिम फेरीत न्यूझीलंड संघाशी भिडेल. ज्यात भारतीय संघ न्यूझीलंडकडून 25 वर्षांचा बदला घेण्यावर लक्ष केंद्रित करेल.
रोहित शर्माने आतापर्यंत 3 आयसीसी फायनलमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. यामध्ये 2023चा एकदिवसीय विश्वचषक, 2023चा जागतिक कसोटी अजिंक्यपद आणि 2024चा टी-20 विश्वचषक यांचा समावेश आहे. आता, तो चौथ्या आयसीसी फायनलमध्ये भारताचे नेतृत्व करण्यास सज्ज आहे. 2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रोहित टॉस करताच दिग्गज कर्णधार महेंद्रसिंग धोनीची बरोबरी करेल.
महेंद्रसिंग धोनीने चार आयसीसी फायनलमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. ज्यामध्ये टीम इंडियाने तीनमध्ये विजय मिळवला. 2007चा टी20 विश्वचषक, 2011चा एकदिवसीय विश्वचषक, 2013 चा चॅम्पियन्स ट्रॉफी, 2014 चा टी-20 विश्वचषक या अंतिम सामन्यांमध्ये त्याने भारतीय संघाचे नेतृत्व केले.
सर्वाधिक आयसीसी फायनलमध्ये भारताचे नेतृत्व करणारे खेळाडू:
महेंद्रसिंग धोनी – 4 सामने
रोहित शर्मा – 3 सामने
सौरव गांगुली – 3 सामने
विराट कोहली – 2 सामने
कपिल देव – 1 सामना
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला हरवून 2024 चा टी-20 विश्वचषक जिंकला. आता त्याने संघाला 9 महिन्यांत दुसऱ्यांदा आयसीसीच्या अंतिम फेरीत नेले आहे. जिथे आणखी एक जेतेपद त्यांची वाट पाहत आहे. रोहितने सध्या सुरू असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चांगले नेतृत्व केले आहे. गोलंदाजीतही योग्य बदल केले आहेत. कर्णधार रोहित डीआरएस घेण्यातही तज्ञ झाला आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आतापर्यंत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात फक्त दोन सामने झाले आहेत, ज्यामध्ये भारताने एक जिंकला आहे आणि एका सामन्यात न्यूझीलंडचा संघ विजय नोंदवण्यात यशस्वी झाला आहे. 2000 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला. तेव्हा किवी संघाने चार विकेट्सने विजय मिळवला होता.
हेही वाचा-
Women’s Day: ऑलिंपिकमध्ये भारतीय महिलांची दैदिप्यमान कामगिरी, पाहा जिद्द, मेहनत आणि विजयाची कहाणी!
काय सांगता! चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पाकिस्तान कनेक्शन? पाहा धडकी भरवणारा योगायोग
टीम इंडियाच्या विजयापूर्वीच शुबमन गिलला मोठी ओळख, ICCकडून विशेष सन्मान






