---Advertisement---

‘तुमच्या मध्ये माझं नाव कशाला?’ मोहम्मद आमीरने नेटकऱ्यांना विचारला खोचक सवाल

mohammad-amir
---Advertisement---

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी आशिया चषक २०२२मधून बाहेर पडल्यानंतर मोहम्मद आमिरने मजेदार प्रतिक्रिया दिली आहे. मुळात शाहीन आफ्रिदी आशिया चषकातून बाहेर पडल्यानंतर अचानकपणे मोहम्मद आमीर नावाने ट्वीटरवर हॅशटॅग ट्रेंड होण्यास सुरुवात झाली. यावर आमिरने ट्विट करत म्हटलं की, “मी ट्विटरवर ट्रेंड होतोय पण हे का?”

आफ्रिदीच्या बाहेर पडल्यानंतर मोहम्मद आमिरला ट्विटरवर ट्रोल केले जाऊ लागले. यामागील एक कारण पाकिस्तानी चाहत्यांनी आमिरला आशिया कपमध्ये खेळण्याची मागणी केली. हे असले तरी दुसरे कारण पाकिस्तानी माजी दिग्गज वकार युनिसशी जोडलेले आहे. वकार युनिसने शाहीन बाहेर पडल्यानंतर भारतीय फलंदाजांची खिल्ली उडवणारे ट्वीट केले होते. त्यानंतर भारतीय चाहत्यांनी वकार युनिससोबत मोहम्मद आमीर आणि शाहीन आफ्रीदीला २०१८सालच्या भारत-पाकिस्तान सामन्यातची आठवण करून दिली आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

एकदाची भेट झालीच! केएल राहुलला आदर्श मानणाऱ्या झिम्बाब्वेच्या खेळाडूला अखेर भेटला भारतीय कर्णधार

एकही तो दिल है, कितनी बार जितोगे! चिमुकल्याच्या विनंतीचा संजूने राखला मान, Video व्हायरल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---