वनडे विश्वचषक 2023 मध्ये शनिवारी (14 ऑक्टोबर) पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. भारताच्या सर्वच गोलंदाजांनी दमदार कामगिरी केल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा व श्रेयस अय्यर यांनी फटकेबाजी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह भारतीय संघाने सलग तीन विजय पूर्ण केले. याबरोबरच भारतीय संघाने पाकिस्तान विरुद्ध विश्वचषकातील आपल्या विजयाची मालिका सुरू ठेवली. या पराभवानंतर पाकिस्तान संघावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद आमिर याने शेलक्या शब्दात पाकिस्तान संघावर टीका केली.
पाकिस्तान संघाने विश्वचषकात सलग दोन विजय मिळवून दमदार सुरुवात केली होती. भारतीय संघाला ते चांगली झुंज देतील अशी अपेक्षा होती. मात्र, भारतीय संघाने त्यांना संघर्ष करू दिला नाही व एकतर्फी विजय मिळवला. पाकिस्तानची मधली फळी आणि गोलंदाज या सामन्यात पूर्णपणे प्रभावहीन दिसले. पाकिस्तान संघावर टीका करताना मोहम्मद आमिर म्हणाला,
“एक संघ म्हणून तुम्हाला जिंकायचे असेल तर, तुम्हाला देशासाठी खेळायला हवं. स्वतःसाठी खेळून हे साध्य होणार नाही. घरच्या मैदानांवर तृतीय दर्जाच्या संघांसोबत खेळून कोणी अव्वल बनत नाही.”
या सामन्याचा विचार केल्यास भारताने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. भारताच्या सर्वच गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत पाकिस्तानचा डाव 191 धावांवर गुंडाळला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा व श्रेयस अय्यर यांनी अर्धशतके करत भारतीय संघाला सात गडी राखून मोठा विजय मिळवून दिला. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
(Mohammad Amir Slams Pakistan Cricket Team After Defeat Against India)
महत्वाच्या बातम्या –
सिक्स हिटिंग मशिन शर्मा जी! तुफानी अर्धशतकासह वनडेत ठोकली षटकारांची ‘ट्रिपल सेंच्युरी’
इंग्लंड सलग दुसऱ्या विजयासाठी प्रयत्नशील, अफगाणिस्तानचे पहिल्या विजयावर लक्ष