पाकिस्तान संघाचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद अमीरने विश्वचषक 2023 स्पर्धेत संघाच्या खराब कामगिरीनंतर कर्णधार बाबर आझमवर जोरदार टीका केली आहे. मोहम्मद आमिरने बाबर आझमवर प्रश्न उपस्थित करत कर्णधाराची मानसिकता बरोबर नसेल तर संघाला अशाच समस्यांना सामोरे जावे लागेल, असे सांगितले.
पाकिस्तान संघ 2023 च्या विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत पोहोचू शकला नाही. संघाने चार सामने जिंकले तर पाच सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले. उपांत्य फेरी गाठण्यासाठी पाकिस्तानला त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात इंग्लंडला मोठ्या फरकाने पराभूत करणे आवश्यक होते परंतु ते तसे करू शकले नाहीत. या खराब कामगिरीनंतर संघावर बरीच टीका होत आहे. पाकिस्तानला त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यातही इंग्लंडकडून पराभवाला सामोरे जावे लागले आणि यासह त्यांचा विश्वचषकातील प्रवास संपला. यामुळे संघावर बरीच टीका होत आहे.
मोहम्मद आमिर (Mohammad Amir) याने या पराभवासाठी कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याला जबाबदार धरले आहे. तो म्हणाला, “पाच ते सहा जणांवर पाकिस्तान क्रिकेट चालवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. कर्णधारही त्यापैकीच एक आम्ही 1992 मध्ये विश्वचषक जिंकला होता आणि रणनिती तशीच होती. 1999 मध्ये आमचा संघ चांगला होता आणि आम्ही फायनलमध्ये पोहोचलो होतो. तर आम्ही 2009 टी20 विश्वचषक आणि 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. बाबर आझम गेली चार वर्षे कर्णधार असून त्यानेच हा संघ बनवला आहे. जोस बटलर हा आपल्या व्यवस्थेचा भाग नाही, मग इंग्लंडने इतका खराब खेळ का केला? इंग्लंडमध्येही व्यवस्था बदलण्याची गरज आहे का?” (Mohammad Amir targets Babar Azam Said He is the one who made this team)
म्हत्वाच्या बातम्या
पाकिस्तानी खेळाडूची राहुलविषयी ‘ही’ प्रतिक्रिया वाचून प्रत्येक भारतीयाला वाटेल अभिमान; म्हणाला, ‘जगातील…’
उपांत्य फेरीबाबत निराशा झालेल्या पाकिस्तान संघाचे मायदेशात जंगी स्वागत! कमेंट्स वेधतील तुमचेही लक्ष्य