वनडे विश्वचषक 2023 मध्ये पाकिस्तान संघ विजेतपदाचा दावेदार होता. मात्र, प्रत्यक्ष स्पर्धेत पाकिस्तनला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. ग्रुप स्टेजच्यचा 9 सामन्यांपैकी 5 सामन्यात पाकिस्तानने विजय, तर चार सामन्यात पराभव स्वीकारला होता. परिणामी संघ उपांत्य फेरीपर्यंत मजल मारू शकला नाही. सोमवारी (13 नोव्हेंबर) पाकिस्तान संघ मायदेशी परतल्याचे समोर आले.
पाकिस्तान क्रिकेट संघाचा विमानतळावरील व्हिडिओ समोर येत आहे. या व्हिडिओ पाकिस्तानमधील असून सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. अनेक चाहते या व्हायरल व्हिडिओच्या कमेंट्समध्ये संघाचे पाकिस्तानमध्ये स्वागत करत आहेत. तर अनेकजण उपांत्य सामन्यात न पोहोचलेल्या पाकिस्तान संघावर टीका देखील करत आहेत. यादरम्यान, अनेकांच्या मजेशीर प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
Pakistan team have reached Pakistan after finishing the World Cup.pic.twitter.com/pJG0waJvUn
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 13, 2023
पाकिस्तानने विश्वचषक 2023 मधील आपला शेवटचा सामना शनिवारी (13 नोव्हेंबर) इंग्लंडविरुद्ध खेळला. या सामन्यात पाकिस्तानला 93 धावांचा मोठा पराभव मिळाला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता होती. 14 ऑक्टोबर रोजी भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तान संघ 7 विकेट्सच्या अंतराने पारभूत झाला.
विश्वचषक स्पर्धेचा एकंदरीत विचार केला, रविवारी (12 नोव्हेंबर) भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील सामन्यानंतर ग्रुप स्टेजचे सर्व सामने संपले. स्पर्धेची उपांत्य फेरी बुधवारी (15 नोव्हेंबर) सुरू होईल. पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियवर खेळला जाईल. तर दुसरा उपांत्य सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कोलकाताच्या ईडन गार्डन्स (16 नोव्हेंबर) याठिकाणी आयोजित केला गेला आहे. विश्वचषक 2023चा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 16-9 नोव्हेंबर रोजी रंगणार आहे. (World Cup 2023 । Pakistan team reached to Pakistan)
महत्वाच्या बातम्या –
‘गृहमंत्री असलेल्या वडिलांमुळे जय शाह शक्तिशाली, श्रीलंका क्रिकेट बर्बाद केलं…’, माजी कर्णधाराचा गंभीर आरोप
‘पाकिस्तान क्रिकेटची आई-बहीण…’, वर्ल्डकपमधील खराब प्रदर्शनानंतर रमीज राजांच्या तळपायाची आग मस्तकात