बॉलिवूड आणि क्रिकेट जगताचे नाते फार काळापासून राहिले आहे. ते म्हणजे नवाब पतौडी आणि शर्मिला टागोर ते विराट कोहली आणि अनुष्का शर्मापर्यंत. ज्या-ज्या वेळी क्रिकेट-बॉलिवूडच्या जोड्या एकत्र आल्या, तेव्हा हे जोडपे आणखीच प्रसिद्ध झालेले पहायला मिळाले आहेत. तरीही काही असेही आहेत, ज्यांचे लग्न तर झालेच परंतु ते पुढे टिकलं नाही. पुढे जाऊन या जोडप्यांमध्ये दुरावा निर्माण झाला.
भारतीय संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरूद्दीन आणि बॉलिवूड अभिनेत्री संगीता बिजलानी (Sangeeta Bijlani) यांची जोडीही अशीच आहे. या जोडप्याबद्दल आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत. यांचे लग्न तर झालेच परंतु पुढे जाऊन या जोडीला एकमेकांपासून दूरही जावे लागले.
अभिनेत्री आणि माजी मिस इंडिया असणाऱ्या संगीताला लहानपणापासूनच बॉलिवूडमध्ये यायचे होते. तिने वयाच्या १६ व्या वर्षापासून मॉडेलिंग सुरु केले आणि फार कमी काळात प्रसिद्धी मिळविली. संगीताने सिनेमात फार काम केले नाही. परंतु आपल्या सुंदरतेमुळे तिने चाहत्यांच्या मनावर राज्य केले होते.
अझरूद्दीनच्या भेटीपूर्वी संगीताचे बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता सलमान खानबरोबर (Salman Khan) नाते होते. दोघांनी एकमेकांना बरीच वर्षे डेट केले होते. त्यानंतर संगीताला दु:ख झाले, जेव्हा सलमान तिला सोडून सोमी अनी नावाच्या मॉडेलला डेट करू लागला होता. सलमानने एका मुलाखतीत सांगितले होते की, संगीताबरोबर त्याच्या लग्नाच्या पत्रिकादेखील छापण्यात आल्या होत्या. परंतु त्याने शेवटी लग्न करण्यास नकार दिला. अशामध्ये संगीताला आधार दिला तो भारताचा तत्कालीन कर्णधार अझरूद्दीनने.
अझरूद्दीन (Mohammad Azharuddin) आणि संगीताची भेट एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान झाली होती. त्यावेळी संगीता उदयोन्मुख अभिनेत्री होती आणि क्रिकेटच्या मैदानात अझरूद्दीन विजयी झेंडा रोवत होता. अझरूद्दीन संगीताला पाहताच तिच्या प्रेमात पडला होता. हळू-हळू दोघांमधील प्रेम वाढत होते. माध्यमांमध्ये या दोघांच्या प्रेमाची चर्चा सुरु झाली होती.
संगीता परदेशातील भारतीय संघाचे सामना पाहताना दिसत होती. तरी एकीकडे अझरूद्दीनचे संगीतावरील प्रेम वाढत होते. तर, दुसरीकडे त्याचा क्रिकेटमधील फॉर्म कमी होत होता. संगीताला भेटण्यापूर्वी अझरूद्दीनचे लग्न झाले होते. तो २ मुलांचा वडील होता. संगीताशी लग्न करण्यासाठी त्याने सर्वकाही सोडण्याची तयारी केली होती.
अझरूद्दीनच्या पत्नीचे नाव नौरीन होते. ती हैद्राबादची राहणारी होती. तसेच ती अझरूद्दीनच्या कुटुंबातील सर्वांची आवडती सून होती. त्यामुळे त्याच्या कुटुंबाला घटस्फोट नको होता. तरीही अझरूद्दीनने कुटुंबाच्या मनाविरुद्ध निर्णय घेत ९ वर्षांच्या नात्याला संपविण्याचा निर्णय घेतला होता.
त्यावेळी अझरूद्दीनला घटस्फोटानंतर पोटगी म्हणून नौरीनला त्याने १ कोटी रुपये द्यावे लागले होते. हा घटस्फोट त्याकाळचा भारतातील सर्वात महागडा समजला गेला होता. अझरूद्दीनने घटस्फोट दिल्यानंतर नौरीनने कॅनडातील व्यावसायिकाशी लग्न केले होते. नौरीनकडून अझरूद्दीनला २ अपत्य होते. त्यातील लहान मुलगा अयाजचा सप्टेंबर २०११मध्ये रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. अयाजला बाईक रेसिंगची आवड होती. तर दुसरा मुलगा असदने नुकतेच सानिया मिर्झाची (Sania Mirza) बहीन अनमबरोबर लग्न केले आहे.
संगीता आणि अझरूद्दीनचे १९९६मध्ये लग्न झाले होते. त्याच्याशी लग्न करण्यासाठी इस्लाम धर्माचा स्विकार केला. त्यानंतर तिने आपले नाव आयशा ठेवले. दोघांचे लग्न १४ वर्षांपर्यंत टिकले. त्यानंतर अझरूद्दीनच्या आयुष्यात बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टामुळे समस्या निर्माण होऊ लागल्या. तसेच २०१०मध्ये दोघेही घटस्फोट घेऊन एकमेकांपासून दूर झाले.
ट्रेंडिंग घडामोडी-
-जेवण चोरताना पकडली गेली पाकिस्तानी खेळाडूची पत्नी, सोशल मीडियावर झाला व्हिडिओ व्हायरल
-मॅच हारल्यावर धोनी काय करतो? त्या खेळाडूने अखेर जगाला सांगतिला धोनीचा तो ‘राज’
-हर्षा भोगलेंचं नाव ऐकल्यावर तुमच्या डोक्यात पहिलं काय येतं? मांजरेकर म्हणतात…