---Advertisement---

संघ सहकाऱ्याच्या मदतीला धावला अझर; उचलणार किडनी शस्त्रक्रियेनंतरचा खर्च

On: मंगळवार, मार्च 1, 2022 3:30 PM
---Advertisement---

हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मोहम्मद अझरुद्दीन (Mohammad azharuddin) यांनी सोमवारी (२८ फेब्रुवारी) माजी भारतीय खेळाडू नोएल डेव्हिडची (Noel david) भेट घेतली. डेव्हिड गेल्या काही वर्षांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त असून, त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. भारतासाठी चार एकदिवसीय सामने खेळणाऱ्या ५१ वर्षीय नोएलने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत हैदराबाद संघासाठी भरपूर क्रिकेट खेळले आहे. आता अझरुद्दीन नोएल डेव्हिडच्या किडनी शस्त्रक्रियेच्या खर्चासह त्याच्या आरोग्याचा खर्च भागवणार असल्याचे म्हटले आहे. नोएल डेव्हिडला हैदराबादच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

एचसीएने जाराी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “सोमवारी हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मोहम्मद अझरुद्दीन यांनी अपोलो हॉस्पिटलमध्ये नोएल डेव्हिडची भेट घेतली. नोएल या महिन्यात अपोलो हॉस्पिटल्स, जुबली हिल्स येथे किडनीच्या शस्त्रक्रियेतून बरा होत आहे.

निवेदनात म्हटले आहे की, “नोएलला शस्त्रक्रियेनंतर निर्जंतुक वातावरणात ठेवावे लागल्याने अझरुद्दीनला आधी भेटता आले नाही. मोहम्मद अझरुद्दीन यांनी नेफ्रोलॉजिस्ट डॉ. सुब्रह्मण्यम यांची भेट घेतली आणि शस्त्रक्रियेसोबतच नंतरच्या काळजीची माहिती घेतली.

हॉस्पिटलच्या सीओओसोबत झालेल्या बैठकीत अझरुद्दीन यांनी स्पष्ट केले की, नोएलच्या शस्त्रक्रियेचा खर्च एचसीए उचलेल. “अपोलो ज्युबली हिल्सचे सीओओ तेजस्वी राव यांच्याशी झालेल्या बैठकीत अझरुद्दीन यांनी म्हटले की नोएलच्या शस्त्रक्रियेचा खर्च एचसीए उचलेल,” असे निवेदनात म्हटले आहे. तसेच, नोएलला त्याचा वैयक्तिक खर्च भागवण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

नोएल हा उजव्या हाताचा फलंदाज आणि गोलंदाज आहे. या अष्टपैलूने क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. ज्याने १९९७ मध्ये भारतासाठी चार एकदिवसीय सामने खेळले होते. त्यावर्षी त्याला दुखापतग्रस्त वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथच्या जागी वेस्ट इंडिजला पाठवण्यात आले. आंतरराष्ट्रीय स्तरावर नोएलला फलंदाजीत फार काही करता आले नाही. त्याने चार विकेट्स घेतल्या होत्या, त्यामध्ये त्याचा इकॉनॉमी रेट चारपेक्षा थोडा जास्त होता. त्याने १९९७ मध्ये श्रीलंकेविरुद्ध शेवटचा एक सामना खेळला.

महत्वाच्या बातम्या

कर्णधार म्हणून पहिल्याच कसोटीत रोहितसमोर संघनिवडीचा पेच? हे आहेत पर्याय (mahasports.in)

सचिन तेंडुलकरच्या बॅटनेच आफ्रिदीने केला होता ‘तो’ जागतिक विक्रम; वाचा बर्थडे बाॅयच्या क्रिकेट प्रवासातील रंजक गोष्टी (mahasports.in)

अफगानिस्तानने टाळला क्लीन स्वीप! अखेरच्या वनडेत केली बांगलादेशवर मात; राशिद-गुरुबाज चमकले (mahasports.in)

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---