क्रिकेट इतिहासात असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीच्या जोरावर जागतिक क्रिकेटमध्ये बरेच नाव कमावले. तथापि, आपल्या देशाकडून खेळण्यापूर्वी अशा खेळाडूंना कठोर परिश्रम आणि प्रतीक्षा करावी लागली. भारतीय क्रिकेट इतिहासात असा एक खेळाडू आहे ज्याला ‘कलाई के जादूगर’ म्हणूनही ओळखले जाते. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन हे त्या खेळाडूंपैकी एक आहे, ज्यांनी पदार्पण करण्यापूर्वी मैदानावर खेळाडूंना पाणी देण्याचे काम करत होते. जेव्हा त्यांनी पदार्पण केले तेव्हा जगभरातील गोलंदाजांना पाणी पाजले. आज(8 फेब्रुवारी) त्याच अझरुद्दीन यांचा 59 वा वाढदिवस आहे.
एका मुलाखती दरम्यान, माजी भारतीय कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी कसोटीतील पदार्पणाची आठवण आणि त्यानंतर त्याच्या 3 शतकांबद्दल सांगितले होते. अझरुद्दीन यांच्या नावावर कसोटी पदार्पण केल्यानंतर पहिल्या तीन कसोटीत शतकं करण्याचा विश्वविक्रम आहे.
‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले होते, ‘खेळ सुरू होण्याच्या फक्त 45 मिनिटांपूर्वी मला माहिती मिळाली की पदार्पण करणार आहेस. मी खूपच घाबरलो. तथापि, मला विश्वास होता. गेल्या तीन-चार महिन्यांत स्थानिक क्रिकेटमध्ये माझी चांगली कामगिरी झाली होती. रणजी करंडक स्पर्धेत दोन्ही डावात शतक झळकावल्यानंतर मी भारतीय संघात आलो. निवडकर्त्यांचाही माझ्यावर खूप विश्वास होता. चंदू बोर्डे सर (तत्कालीन मुख्य निवडकर्ता) यांनी मला खेळायला हवे असा आग्रह धरला.’
मोहम्मद अझरुद्दीन म्हणाले होते की, ‘त्यावेळी खराब फॉर्ममुळे कपिल देव यांना संघाबाहेर ठेवण्यात आले होते. त्याआधी खेळल्या गेलेल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये मी 12 वा खेळाडू म्हणून संघात होतो.’
‘पहिल्या दोन कसोटी सामन्यांत मी बारावा खेळाडू होतो. त्यामुळे कसोटी क्रिकेट कसे खेळले जाते आणि मानसिक तयारी कशी करावी हे मला किमान समजले होते. मी बघून बरेच काही शिकलो. सनी भाई (गावस्कर) यांच्याबरोबर खेळणे मला भाग्यवान वाटले. त्या संघात अनेक महान खेळाडू होते – दिलीप भाई (वेंगसरकर), जिमी भाई (मोहिंदर अमरनाथ), किरी भाई (सय्यद किरमानी). कपिल पाजी त्या सामन्यात नव्हते, परंतु मला सल्ला देऊ शकणारे बरेच लोक होते. ‘
”पहिल्यांदा मी इतक्या मोठ्या जमावासमोर खेळत होतो. चेंडू आजूबाजूला फिरत होता. डिसेंबरच्या उत्तरार्धात कोलकाता येथे खूपच थंड होते. त्यावेळी प्रकाश खूप कमी होतो. मी 322 चेंडू खेळून 10 चौकारांच्या मदतीने 110 धावा केल्या. येथे परिस्थिती स्ट्रोक मारण्यास अनुकूल नव्हती. मी लक्ष केंद्रित केले होते, जे मी केले त्यात मला दिवसाच्या शेवटी शतक मिळाले. हे खूप समाधानकारक होते. माझ्या पहिल्या सामन्यात मी शतक झळकाविणे हे माझे नशीब होते,” असे मोहम्मद अझरुद्दीन यांनी सांगितले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
राहुल द्रविड स्वतः गोलंदाजी करण्यासाठी उतरला मैदानात, बीसीसीआयने अशी उडवली खिल्ली
कोलकाता ते कानपुर व्हाया मद्रास, तब्बल ३७ वर्षांपासून कायम आहे अझरुद्दीन यांचा ‘हा’ विश्वविक्रम
ओ शेठ.. तुम्ही नादच केलाय थेट! रोनाल्डोने गाठला ४०० मिलियन इंस्टाग्राम फॉलोवर्सचा जादुई आकडा