---Advertisement---

राहुल द्रविड स्वतः गोलंदाजी करण्यासाठी उतरला मैदानात, बीसीसीआयने अशी उडवली खिल्ली

On: मंगळवार, फेब्रुवारी 8, 2022 8:55 AM
Rahul Dravid
---Advertisement---

सध्या भारत आणि वेस्ट इंडिज (India vs west indies) या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला वनडे सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला. रोहित शर्मा (Rohit Sharma)  पहिल्यांदाच पूर्णवेळ कर्णधार म्हणून मैदानात उतरला आहे. पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने जोरदार विजय मिळवला होता. तसेच या मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे. दरम्यान बीसीसीआयने राहुल द्रविडचा (Rahul Dravid)  एक फोटो शेअर करत त्याची खिल्ली उडवली आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआयने ) आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड गोलंदाजी करताना दिसून येत आहे. या फोटोवर कॅप्शन देत त्यांनी लिहीले की, “अनिल कुंबळेने पाकिस्तान संघाविरुद्ध एकाच डावात १० गडी बाद केल्याचा २३ वा वाढदिवस जल्लोषात साजरा..” अनिल कुंबळे यांनी २३ वर्षांपूर्वी पाकिस्तान संघाविरुद्ध एकाच डावात १० गडी बाद करण्याचा पराक्रम केला होता. त्यावेळी ते जिम लेकरनंतर असा कारनामा करणारे दुसरे गोलंदाज ठरले होते.

भारतीय संघाने ३ वनडे सामन्यांच्या मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे. दरम्यान दुसऱ्या सामन्यात भारतीय संघात काही बदल पाहायला मिळू शकतात. भारतीय संघाचा उपकर्णधार केएल राहुल पहिल्या वनडे सामन्यातून बाहेर होता. त्याच्या ऐवजी ईशान किशनने डावाची सुरुवात केली होती. केएल राहूलने आपल्या बहिणीच्या विवाह सोहळ्याकरिता रजा घेतली होती. त्यामुळे आगामी वनडे सामन्यात तो डावाची सुरुवात करताना दिसून येऊ शकतो.

पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाचा ६ गडी राखून विजय

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. वेस्ट इंडिज संघाकडून प्रथम फलंदाजी करताना जेसन होल्डरने सर्वाधिक ५७ धावांची खेळी केली. तर फॅबियन ॲलेनने २९ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिज संघाला अवघ्या १७६ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ६० धावांची खेळी केली. तर सूर्यकुमार यादवने नाबाद ३४ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने ६ गडी राखून विजय मिळवला.

महत्वाच्या बातम्या:

केएल लागला तयारीला! दुसऱ्या वनडेत दम दाखवायला उपकर्णधार उत्सुक

गेल्या १६ वनडेत दहाव्यांदा विंडीजचा संघ सर्वबाद; अष्टपैलू होल्डर म्हणाला, ‘आम्हाला विकेट्सचे महत्त्व…’

पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यानंतर दीपक हुडा झाला इमोशनल; म्हणाला, ‘विराट भैय्याकडून कॅप मिळणे…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---