भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीन यांना हैदराबाद हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष पदावरून काढून टाकण्यात आले आहे. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अपेक्स कौन्सिलने बुधवारी (१६ जून ) कारणे दाखवा नोटीस बजावली होती. आता अंतिम निर्णय येईपर्यंत त्यांना पदावरून काढून टाकण्यात आले आहे.”
अपेक्स कौन्सिलने बजावलेल्या नोटिसनुसार मोहम्मद अझहरुद्दीन यांचे सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे. या नोटिसमध्ये म्हटले आहे की, “हैद्राबाद क्रिकेट संघटनेच्या सदस्यांकडून आपल्या विरुद्ध बऱ्याच तक्रारी आल्या आहेत. याच तक्रारींचा गांभीर्याने विचार करून अपेक्स कौन्सिलने ही नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला आहे. अपेक्स कौन्सिल तुम्हाला निलंबित करत आहे. या तक्रारीचा तपास होईपर्यंत तुमचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.” मोहम्मद अझहरुद्दीन यांची २०१९ मध्ये हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. परंतु ते अनेकदा वादाच्या विळख्यात अकडले आहेत.
या नोटिसनुसार मोहम्मद अझहरुद्दीन यांनी दुबईतील एका खासगी क्रिकेट क्लबचे सदस्यत्व स्वीकारल्याची गोष्ट लपवून ठेवली होती. यासोबतच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून मान्यता प्राप्त नसताना देखील त्यांनी या क्लबच्या वतीने स्पर्धेत सहभाग घेतला होता. (Mohammad Azharuddin removed from the post of the president of the HCA)
मोहम्मद अझहरुद्दीन यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
मोहम्मद अझहरुद्दीन यांनी भारतीय संघासाठी ३३४ वनडे सामने खेळले आहेत. यात त्यांनी ३६.९ च्या सरासरीने ९३७८ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने ७ शतक आणि ५८ अर्धशतक झळकावले आहेत. कसोटी कारकिर्दीत त्यांनी ९९ कसोटी सामने खेळले. यामध्ये त्यांनी ४५.०च्या सरासरीने ६२१५ धावा केल्या आहेत. यामध्ये त्यांनी २१ अर्धशतक आणि २२ शतक झळकावले आहेत. मोहम्मद अझहरुद्दीन हे भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक आहेत. मोहम्मद अझहरुद्दीन हे जगातील एकमेव फलंदाज आहेत, ज्यांनी आपल्या कारकिर्दीतील पहिल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये शतक झळकावले आहे.
महत्वाच्या बातम्या:
दिग्गज गोलंदाजाने निवडला अंतिम सामन्यासाठी भारताचा संभाव्य संघ, सिराजला वगळून इशांतला दिले स्थान
पदार्पणाच्या सामन्यातच चमकली ही भारतीय फिरकीपटू, दिवंगत वडिलांना समर्पित केली कामगिरी
काय सांगता! ऑस्ट्रेलियन खेळाडू सोडणार आयपीएल? वाचा काय म्हणाले मुख्य निवडकर्ता