भारत आणि इंग्लंड संघात नेहमीच रोमांचक सामने पाहायला मिळतात. या दोन संघात होणाऱ्या मालिकांमध्ये मोठी कामगिरी करणाऱ्या खेळाडूला नेहमीच लक्षात ठेवले जाते. तसेच काही सामनेही ऐतिहासिक ठरतात. असाच एक सामना २८ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी (२९ जानेवारी) कोलकाता येथे भारत विरुद्ध इंग्लंड संघात एक रोमहर्षक कसोटी सामना झाला होता. या सामन्यात तत्कालिन भारतीय कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी तडाखेबंद खेळी केली होती. विशेष म्हणजे, त्यावेळी भारताने ८ विकेट्सने इंग्लंडवर मात करत ऐतिहासिक विजय नोंदवला होता.
कर्णधार अझरुद्दीन राहिले विजयाचे नायक
२९ जानेवारी ते २ फेब्रुवारी १९९३ या कालावधीत हा सामना खेळण्यात आला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने अवघ्या ९३ धावांवर ३ महत्त्वपुर्ण विकेट्स गमावल्या होत्या. यात मनोज प्रभाकर, नवजोत सिंग सिद्धू आणि विनोद कांबळी यांचा समावेश होता. त्यामुळे डावाची जबाबदारी तत्कालिन कर्णधार अझरुद्दीन यांच्या खांद्यावर होती.
अझरुद्दीन यांनीही संघाची परिस्थिती लक्षात घेता आतिशी खेळी केली होती. १९७ चेंडूंचा सामना करताना १ षटकार आणि १२ चौकारांच्या मदतीने त्यांनी १८२ धावा केल्या होत्या. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर यानेही अर्धशतकी कामगिरी करत अझरुद्दीन यांच्यासोबत शतकी भागिदारी साकारली होती.
इंग्लंड संघाला फॉलोऑन खेळण्यास भाग पाडले
अझरुद्दीन यांच्या झुंजार दीडशतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या डावात इंग्लंडपुढे ३७२ धावांचे भलेमोठे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरात इंग्लंडचा एकही फलंदाज अर्धशतक करेपर्यंतही भारतीय गोलंदाजांपुढे टिकू शकला नाही. परिणामत केवळ १६३ धावांवर इंग्लंडचा पहिला डाव संपुष्टात आला. त्यामुळे भारताने दुसऱ्या डावात इंग्लंडला फॉलोऑप खेळण्यास भाग पाडले होते. पुढे इंग्लंडने दुसऱ्या डावात २८६ धावा करत नाममात्र ८२ धावांची आघाडी घेतली होती. भारतीय फलंदाजांनी २ विकेट्सच्या नुकसानावर लक्ष्य पूर्ण करत ८ विकेट्सने सामना खिशात घातला होता.
अझरुद्दीन ठरले होते सामनावीर
अझरुद्दीन यांनी केलेली दीडशतकी खेळी ही त्या सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळी ठरली होती. त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांना मॅन ऑफ द मॅच म्हणजेच सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
रवी शास्त्रींचा द्रविडला मोलाचा सल्ला, म्हणाले, ‘जर भविष्याचा विचार करत असाल, तर…’
Video: विजेतेपदाचा आनंदच वेगळा! उत्साहाच्या भरात फुटले नाक, तरीही खेळाडूने हसत दिली मुलाखत
फलंदाजीत फेल झाल्यानंतर अजिंक्य रहाणेने सुरू केली शेती!! ‘त्या’ फोटोवरून चाहत्यांनी घेतली मजा