---Advertisement---

अरे माझी कोरोना टेस्ट तर निगेटिव्ह; पाकिस्तानच्या क्रिकेटपटूचे खळबळजनक ट्विट

On: गुरूवार, जून 25, 2020 4:35 PM
---Advertisement---

मुंबई ।  इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी केली. यात सोमवारी तीन तर मंगळवारी सात खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. धक्कादायक बाब म्हणजे यातील एका खेळाडूने आपली कोरोना चाचणी दुसरीकडं केली त्यात त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. पीसीबीच्या आता या वैद्यकीय अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

पाकिस्तानचा खेळाडू मोहम्मद हाफीज याला करुणाची बाधा झाली असल्याचे पीसीबीने सांगितले होते. त्यानंतर मोहम्मद हाफिजने वैयक्तिकरित्या आपला कोरोना अहवाल तपासला. यात त्याचा अहवाल निगेटीव्ह आला. विशेष म्हणजे हाफीजने त्याच्या परिवारातील सर्व सदस्यांची कोरोनाचा चाचणी केली. त्यांचाही अहवाल निगेटीव्ह आला.

त्यानंतर मोहम्मद हाफिजने आपला कोरोना अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती ट्विट करून दिली. विशेष म्हणजे हाफिजने आपल्या पोरांना अहवालाची मुळ प्रत ट्विट केली आहे. त्याच्या या ट्विटनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डात एकच खळबळ उडाली आहे.

पीसीबीने खेळाडूंच्या केलेल्या कोरोना चाचणीत फखर जमान, इमरान खान, मोहम्मद रिजवान, वहाब रियाज, हारिस रऊफ, शादाब खान, काशिफ भट्टी, मोहम्मद हफीज, मोहम्मद हसनैन आणि हैदर अली यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

मोहम्मद अब्बास,  नसीम शाह, सरफराज अहमद, शाहीन अफरीदी, शान मसूद, सुहैल खान यासिर शाह, आबिद अली, असद शफीक, अजहर अली, बाबर आजम, फहीम अशरफ, इफ्तिकार अहमद, इमाम उल हक, खुशदिल शाह यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे.

पाकिस्तान क्रिकेट संघातील दहा खेळाडूंचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने इंग्लंड दौरा संकटात सापडला आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात 3 कसोटी आणि 3 टी 20 सामन्यांची मालिका होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---