---Advertisement---

मोहम्मद हाफीजची पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला धमकी, म्हणाला ‘मी सर्वांना उघडे पाडेन…

On: शनिवार, फेब्रुवारी 17, 2024 3:34 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग प्रमाणेच पाकिस्तानमध्ये सुरू झालेल्या पाकिस्तान सुपर लीगचा आगामी हंगाम 17 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. मात्र, याआधीच पाकिस्तान क्रिकेटमध्ये गोंधळ सुरू झाला आहे जो थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. तसेच एकदिवसीय विश्वचषक २०२३ पासून पाकिस्तान क्रिकेटमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

तसेच एकदिवसीय विश्वचषक 2023 नंतर कर्णधार आणि प्रशिक्षक सर्वांना काढून टाकण्यात आले आहे. याबरोबरच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षही बदलले आहेत. अशातच 4 वर्षांसाठी नियुक्त करण्यात आलेला दिग्दर्शक मोहम्मद हाफिजला 2 महिन्यांतच हटवण्यात आले आहे. यानंतर हाफिजने आता उघडपणे पीसीबीला सर्वांची पोल खोल करण्याची धमकी दिली आहे.

याबरोबच, विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानी संघाची कामगिरी अत्यंत खराब झाली होती. तसेच पाकिस्तान संघाला विश्वचषकाची उपांत्य फेरी देखील गाठता आली नव्हंती. यामुळे हाफिजची संघाच्या संचालकपदी निवड करण्यात आली होती. तरी देखील पाकिस्तान संघाच्या कामगिरीमध्ये कोणताही फरक पडला नाही.

यानंतरही, पाकिस्तानचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3-0 असा पराभव आणि टी-20 मालिकेत न्यूझीलंडविरुद्ध 4-1 अशा पराभवाच्या वेळी हाफिजने संघ संचालक म्हणून जबाबदारी स्वीकारली. पण आता पदावरून हटवल्यानंतर हाफिजनेही खुलासा केला आहे की, त्याला चार वर्षांसाठी कराराची ऑफर देण्यात आली होती, मात्र नंतर ती दोन महिन्यांपर्यंत कमी करण्यात आली आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून हाफिज म्हणाला की, ‘मी नेहमीच पाकिस्तानला प्राधान्य दिले आहे आणि सन्मान आणि अभिमानाने त्याचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच सकारात्मक सुधारणा करण्यासाठी मी पीसीबी संचालक म्हणून नवीन भूमिका स्वीकारली होती, परंतु दुर्दैवाने पीसीबीने प्रस्तावित केलेला माझा चार वर्षांचा कार्यकाळ दोन महिन्यांत संपुष्टात आणला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---