अनेकदा आपण आयसीसीने एखाद्या खेळाडूवर बंदी घातल्याचे ऐकत असतो. आयसीसीने घातलेल्या बंदीनंतर कोणत्याही खेळाडूला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळता येत नाही. कोणत्याही गोलंदाजावर आयसीसी प्रामुख्येने त्याच्या गोलंदाजीच्या ऍक्शनमुळे बंदी घालू शकते. याच कारणावरून पाकिस्तानचा युवा गोलंदाज मोहम्मद हसनैन याच्यावर आयसीसीने बंदी घातली होती. मात्र, आता मोहम्मदवरील ही बंदी काढण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलियातील टी२० सपर्धा बिग बॅश लीगमध्ये (Big Bash League) पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद हसनैनची (Mohammad Hasnain) गोलंदाजी ऍक्शन संशयास्पद असल्याचे वृत्त समोर आले होते. आयसीसीच्या देखरेखीखाली घेतलेल्या पुनरावलोकन चाचणीमध्ये त्याची ऍक्शन ग्राह्यय धरली आहे. पीसीबी आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. “तो आता जागतिक स्तरावर देशांतर्गत क्रिकेटसह सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये गोलंदाजी पुन्हा सुरू करू शकतो,” असे पीसीबीने म्हटले आहे.
हसनैनच्या गोलंदाजी ऍक्शनला आयसीसीने मंजूर दिली आहे. जेणेकरून तो क्रिकेटच्या सर्व स्तरांवर खेळू शकेल. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) गुरुवारी सांगितले की हसनैनची गोलंदाजीची ऍक्शन असल्याचे आढळून आले आहे आणि पुन्हा तपासणीत त्याची कोपर आयसीसीच्या वैध गोलंदाजीच्या नियमांनुसार १५ अंशांच्या आत वाकलेली असल्याचे आढळले आहे.
दरम्यान, मोहम्मद हसनैनने पाकिस्तानसाठी १८ टी२० आणि ८ वनडे सामने खेळले आहेत. त्याने २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण केले. त्याच्या नावावर आतापर्यंत १२ एकदिवसीय आणि १७ टी२० विकेट्स आहेत. या पाकिस्तानी गोलंदाजाचे वैशिष्ट्य म्हणजे तो केवळ १५० किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करत नाही तर चेंडू स्विंग करण्यातही तो पारंगत आहे.
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘मी ही जागा कुठेतरी पाहिलीये’, दिनेश कार्तिकच्या पुनरागमनावर माजी दिग्गजाची प्रतिक्रिया व्हायरल
आरसीबीच्या वेगवान गोलंदाजाचे रणजी ट्रॉफीत विक्रमी अर्धशतक, ‘एवढ्या’ चेंडूत ठोकली फिफ्टी
अंकितने केलेलं ‘मूसेवाला’ सेलिब्रेशन भलतंच गाजतय, पाहा व्हिडिओ