---Advertisement---

मन जिंकणारं व्यक्तव्य! मोहम्मद कैफने अनिल कुंबळेबद्दल दिली अशी काही प्रतिक्रिया की चाहतेही झाले खूश

---Advertisement---

आयसीसीने काही दिवसांपूर्वी हॉल ऑफ फेममधील फलंदाजांच्या कामगिरीचे कौतुक करताना साजरा करताना भारताचे माजी दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे, यांचा एक व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेयर केला होता. यानंतर भारताचा माजी फलंदाज मोहम्मद कैफने अनिल कुंबळेचे कौतुक केले आहे आणि त्यांच्यासाठी ट्विटरवर एक खास संदेश लिहिला आहे.

आयसीसीने शेयर केलेल्या व्हिडिओमध्ये कुंबळेच्या कारकीर्दीतील शानदार कामगिरी आणि त्यांच्या काही विक्रमांची माहिती दिली होती. कैफने कुंबळेची स्तुती केलेल्या ट्विटमुळे अनेकांनी कैफचे देखील कौतुक केलेले आहे.

मोहम्मद कैफने अनुभवी फिरकी गोलंदाज अनिल कुंबळेसाठी ट्विटमध्ये लिहिले की, ‘जेव्हा मी माझे पहिले एकदिवसीय शतक ठोकले तेव्हा नॉन स्ट्राईकर असलेल्या कुंबळे यांनी माझ्यावर खूप विश्वास दाखवला होता. एक गुरू, एक आदर्श व्यक्तिमत्व. या आयसीसी हॉल ऑफ फेम मधील खेळाडूची कारकीर्द नक्कीच साजरी करण्यासारखी आहे.”

कैफच्या या खास मेसेजबद्दल कुंबळे यांनी देखील कैफचे आभार मानले आहेत.

श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा यांनीही कुंबळेचे कौतुक केले आहे. संगकारा यांनी प्रतिक्रिया दिली की, कुंबळे एक अशा गोलंदाजांपैकी आहे, ज्यांनी मला आपल्या कारकीर्दीत रात्रीस झोप येऊ दिली नव्हती. ते म्हणाले की, कुंबळेविरुद्ध फलंदाजी करणे कठीण काम होते आणि त्यांच्या गोलंदाजीत बरेच वैविध्य होते. कुंबळे यांनी कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेतलेल्या आहेत, तर सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत ते जागतिक क्रिकेटमध्ये  मुरलीधरन आणि शेन वॉर्न नंतर तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

अनिल कुंबळे यांच्या कारकिर्दीचा विचार केला असता त्यांनी भारताकडून 132 कसोटी सामने खेळलेले आहेत. यामध्ये त्यांनी 29.5 च्या सरासरीने 619 बळी मिळवलेले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यांनी भारताकडून 271 सामने खेळले असून 337 बळी मिळवलेले आहेत. या शानदार कामगिरीमुळेच कुंबळे यांचा समावेश भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये केला जातो.

महत्त्वाच्या बातम्या – 

ठरलं तर! शाहिन आफ्रिदीच होणार शाहिदचा जावई, स्वत:च केली घोषणा

जेव्हा ब्रेट लीची गोलंदाजी खेळतांना आकाश चोप्राला फुटला होता घाम, पाहा व्हिडिओ

दीपिका पदुकोण ते किम शर्मा! ‘या’ बॉलीवूड अभिनेत्रींसह होते युवराजचे अफेअर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---