भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्रा हा सध्याच्या घडीचा एक लोकप्रिय सलामीवीर आहे. आपल्या हिंदीतील बहारदार समालोचनाने तो चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. केवळ टेलिव्हिजन वरील समालोचनच नव्हे तर त्याच्या सोशल मिडीयावरील व्हिडिओंनी देखील तो चर्चेत असतो. मात्र नेहमी इतर क्रिकेटपटूंच्या खेळांचे वर्णन करणार्या आकाश चोप्राचा स्वतःच्या खेळाचा व्हिडिओ समोर आला आहे. जो सोशल मिडीयावर वेगाने व्हायरल होतो आहे.
ब्रेट ली विरुद्ध फलंदाजी करतांनाचा व्हिडिओ
आकाश चोप्रा भारतीय संघाकडून सलामीवीर म्हणून काही काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला आहे. २००४ साली ऑस्ट्रेलिया दौर्यावर गेलेल्या भारतीय संघाचा तो भाग होता. या दौर्यावर भारतीय संघ सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली खेळत होता. यातील एका सामन्यात आकाश चोप्रा आक्रमक सलामीवीर वीरेंद्र सेहवागसह सलामीला फलंदाजीसाठी उतरला होता. या सामन्यात एका षटकात आकाश चोप्रा समोर ब्रेट ली गोलंदाजीसाठी आला. त्याचाच व्हिडिओ आता समोर आला आहे.
आकाश चोप्राला फुटला घाम
या व्हिडिओत दिसत असल्याप्रमाणे ब्रेट लीचा सामना करतांना आकाश चोप्राला चांगलाच घाम फुटला होता. कारण ब्रेट ली चांगल्याच वेगाने गोलंदाजी करत होता. या षटकात पहिल्या चेंडूवर आकाशची बॅट देखील हलली नाही. त्यानंतर दुसर्या चेंडूवर त्याने शॉट खेळला, पण बॅटची कड लागून तो चेंडू स्लिप मध्ये गेला. पण तो चेंडू नोबॉल असल्याने आकाशला जीवनदान मिळाले. तिसर्या चेंडूवर पुन्हा एकदा बॅटची कड लागली, पण स्लिप मध्ये उभ्या असलेल्या सायमन कॅटिचने झेल सोडल्याने त्याला पुन्हा जीवनदान मिळाले.
यानंतर चौथ्या चेंडूवर लेगसाईडला चौकार मारत आकाशने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. यापुढचा चेंडू ब्रेट लीने बाऊन्सर टाकला. हा चेंडू त्याने सोडून दिला. मात्र एकूण संपूर्ण षटकात ब्रेट लीची गोलंदाजी खेळतांना आकाश चोप्राची त्रेधातिरपीट उडाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळेच हा व्हिडिओ आता वेगाने व्हायरल होतो आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
दीपिका पदुकोण ते किम शर्मा! या बॉलीवूड अभिनेत्रींसह होते युवराजचे अफेअर
असला कसला अंपायर? गोलंदाजाला आणले रडकुंडीला, पाहा मजेदार व्हिडिओ
दुर्दैवी! देशाचे प्रतिनिधित्व केलेली खेळाडू करतेय वीटभट्टीवर काम, क्रीडामंत्र्यांनी घेतली दखल