---Advertisement---

दुर्दैवी! देशाचे प्रतिनिधित्व केलेली खेळाडू करतेय वीटभट्टीवर काम, क्रीडामंत्र्यांनी घेतली दखल

On: रविवार, मे 23, 2021 6:40 PM
---Advertisement---

काळाचा महिमा काहीसा विचित्र आहे. कधीकधी तो एखाद्याला उच्चस्थानी पाठवितो, तर एक वेळ तो त्याच व्यक्तीला दोन वेळच्या भाकरीसाठी महाग करतो. झारखंडमधील महिला फुटबॉलपटू संगीता सोरेनचीही अवस्था सध्या अशीच काहीशी झाली आहे. एकेकाळी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय महिला संघाचे प्रतिनिधित्व करणारी संगीता आज आर्थिक चणचणीमुळे दोन वेळची भूक भागवण्यासाठी चक्क वीटभट्टीवर काम करत आहे. संगीता सोरेनबद्दल माहिती मिळताच महिला आयोगाने झारखंड सरकारला पत्र लिहून तिला आर्थिक सहाय्य करण्याचे आवाहन केले.

महिला आयोग सरसावला मदतीसाठी

झारखंडची ही महिला फुटबॉलपटू संगीता सोरेनने एकेकाळी मोठी स्वप्ने पाहिली होती. मात्र, वाईट वेळेमुळे आज तिला वीटभट्टीवर काम करावे लागत आहे. आर्थिक तंगीनेमुळे त्रस्त असलेल्या या फुटबॉलपटूविषयी माहिती मिळताच राष्ट्रीय महिला आयोग मदतीसाठी सरसावला.

राष्ट्रीय महिला आयोगाने झारखंड सरकारला एका आंतरराष्ट्रीय फुटबॉलरला आर्थिक संकटामुळे वीटभट्ट्यांमध्ये काम करण्यास भाग पडल्याने मदत करण्यास सांगितले. आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी झारखंड सरकारच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवून मदत मागितली आहे.

त्यांनी या पत्रामध्ये लिहिले, ‘फुटबॉलपटू संगीताची किती देशासाठी लज्जास्पद आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने तात्काळ पुढे येत या समस्येचे निराकरण करायला हवे. संगीताने केवळ आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले नाही तर, आपल्या कामगिरीने झारखंडचे नाव जगात मोठे केले.’

रेखा शर्मा यांनी आपल्या पत्राची एक प्रत भारतीय फुटबॉल महासंघाला देखील पाठवली आहे.

क्रीडामंत्र्यांनी घेतली दखल
भारतासाठी १८ वर्षाखालील व १९ वर्षाखालील वयोगटातील सामने खेळलेल्या संगीता हिने झारखंडचे नेतृत्व देखील केले आहे. ती वीटभट्टीवर काम करत असल्याची माहिती पुढे आल्यानंतर भारत सरकारचे क्रीडामंत्री किरण रिजिजू यांनी संगीता हिला शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले.

जिल्हा फुटबॉल संघटनेने देखील तिला तात्काळ १०,००० रुपयांची मदत केली.

महत्त्वाच्या बातम्या – 

“रोहित कधीही रागावलेला दिसला नाही”, मुंबईच्या ‘या’ गोलंदाजाची स्तुतीसुमने

बाद झाल्यावर विराटने दिलेली ‘ही’ प्रतिक्रिया, आवेश खानने केला खुलासा

हे जरा नवीनच! ‘ही’ महिला क्रिकेटपटू होती ब्राव्होची मोठी चाहती, सगळीकडे लिहीत असत ४७ जर्सी नंबर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---