---Advertisement---

हे जरा नवीनच! ‘ही’ महिला क्रिकेटपटू होती ब्राव्होची मोठी चाहती, सगळीकडे लिहीत असत ४७ जर्सी नंबर

---Advertisement---

कोणताही युवा क्रिकेटपटू क्रिकेट खेळण्यास सुरुवात करतो तेव्हा त्याचा कोणीतरी आदर्श असतो. तो त्या खेळाडूप्रमाणे बनण्याचा प्रयत्न करतो. तसेच, आपल्या आवडत्या खेळाडूच्या अनेक गोष्टी त्या युवा खेळाडूच्या पसंतीसही उतरतात. सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणारी वेस्ट इंडीजची महिला क्रिकेटपटू शकीरा सेलमनने नुकतेच आपल्या आदर्श असणाऱ्या व सर्वाधिक आवडत्या खेळाडूविषयी खुलासा केला आहे. शकीरा ही वेस्ट इंडीजची सर्वात अनुभवी महिला क्रिकेटपटू मानली जाते.

मी या खेळाडूची सर्वात मोठी चाहती
वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू डॅरेन गंगा याला युट्यूबवर दिलेल्या एका मुलाखतीत शकीरा सेलमनहीने कारकिर्दीतील अनेक घटनांना उजाळा दिला. त्यावेळी तिने बोलताना वेस्ट इंडीजचा दिग्गज अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो हा आपला आवडता खेळाडू असल्याचे सांगितले.

आपण ब्राव्होची किती मोठी चाहती आहे, हे सांगताना शकीरा म्हणाली, “जेव्हा मला सर्वप्रथम २००८ मध्ये वेस्ट इंडीज संघासाठी बोलावणे आले तेव्हा मी खुप खुश होते. त्यावेळी मी ब्राव्होची खूप मोठी चाहती होते. ब्राव्होचा जर्सी नंबर असलेला ४७ हा आकडा मी सर्व ठिकाणी लिहिला होता. मी वापरत असलेल्या सर्व टी-शर्टवर देखील ४७ क्रमांक लिहीत.”

शकीरा ही वेस्ट इंडीज संघासाठी ४ क्रमांकाची जर्सी घालून क्रिकेट खेळते. पुरुष संघांमध्ये ४ क्रमांकाची जर्सी यष्टीरक्षक शाई होप वापरतो.

अशी राहिली आहे कारकीर्द
शकीरा सेलमनही सध्या वेस्ट इंडीज संघातील अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. ३१ वर्षीय शकीराने आत्तापर्यंत वेस्ट इंडीजसाठी ७६ वनडे व ८२ टी२० सामने खेळले आहेत. यामध्ये तिने अनुक्रमे ६० आणि ४८ बळी मिळवले आहे. २०१६ मध्ये महिला संघाने जिंकलेल्या टी२० विश्वचषकात तिने मोलाची भूमिका बजावलेली. मागील वर्षी शारजा येथे झालेल्या वुमेन्स टी२० लीगमध्ये ती अखेरच्या वेळी खेळताना दिसली होती.

महत्त्वाच्या बातम्या – 

सोशल मीडियाची कमाल! २४ तासात ‘त्या’ क्रिकेटरला मिळाला स्पॉन्सर; बुटांचे सोल चिटकवून वापरावे लागत असल्याची मांडली होती व्यथा

इंग्लंड दौरा ‘कर्णधार’ विराट कोहलीसाठी ठरणार लाभदायी; ‘हे’ ३ मोठे विक्रम करु शकतो नावावर

फलंदाजी, गोलंदाजी अन् क्षेत्ररक्षण; तिन्हीतही परफेक्ट असणारा ‘हा’ खेळाडू WTC फायनलमध्ये ठरेल एक्स फॅक्टर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---