---Advertisement---

सोशल मीडियाची कमाल! २४ तासात ‘त्या’ क्रिकेटरला मिळाला स्पॉन्सर; बुटांचे सोल चिटकवून वापरावे लागत असल्याची मांडली होती व्यथा

---Advertisement---

क्रिकेटमध्ये एक काळ असा होता, जेव्हा झिम्बाब्वे सारख्या देशाचाही एक वेगळा दबदबा होता. या संघाकडून काहीवर्षांपूर्वी अँडी फ्लॉवर, ग्रँट फ्लॉवर, डंकन फ्लेचर, हिथ स्ट्रिक, तातेंदा तायबू, हेन्री ओलोंगा असे काही दिग्दज खेळाडू खेळले. पण हळूहळू या खेळाडूंच्या निवृत्तीनंतर झिम्बाब्वे संघाचा दर्जा खालावत गेल्याचे दिसले. आता तर त्यांच्या संघातील खेळाडूंना स्पॉन्सर शोधण्यासाठीही संघर्ष करावा लागत असल्याचे दिसत आहे.

नुकतेच झिम्बाब्वेचा क्रिकेटपटू रायन बर्लने शनिवारी (२२ मे) ट्विट करत व्यथा मांडली होती. त्याने ट्विट केले होते की ‘आम्हाला स्पॉन्सर मिळेल असे पर्याय आहेत का, ज्यामुळे आम्हाला प्रत्येक मालिकेनंतर आमच्या बुटांना (बुटांचे सोल) चिटकवावे लागणार नाही.’ या ट्विटसह त्याने त्याच्या बुटांचा फोटोही शेअर केला होता.

त्याचे हे ट्विट २४ तासात प्रचंड व्हायरल झाले. क्रिकेट रसिकांनी त्याला यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या. अनेकांनी लहान देशांना मिळणाऱ्या मानधनावरही प्रश्नचिन्ह उभे केले.

‘पुमा’चा पुढाकार
अखेर बर्लच्या या ट्विटचा त्याला फायदा झाला. त्याच्या या ट्विटनंतर २४ तासांच्या आतच पुमा कंपनीने (PUMA) त्याला प्रतिक्रिया देत स्पॉन्सरशीप देण्याचे अश्वासन दिले.

पुमाच्या या निर्णयानंतर बर्लनेही त्यांचे आभार मानत ट्विट केले, ‘मला हे सांगताना खूप अभिमान वाटत आहे की मी पुमाशी जोडला जात आहे. हे सर्व गेल्या २४ तासांत चाहत्यांच्या मदतीमुळे आणि पाठिंब्यामुळे शक्य झाले आहे. मी तुमचा कृतज्ञ राहिले. सर्वांचे धन्यवाद.’

अशी आहे बर्लची आंतरराष्ट्रीय कारकिर्द 
अष्टपैलू असलेल्या २७ वर्षीय बर्लने २०१७ साली अफगाणिस्तानविरुद्धच्या टी२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने आत्तापर्यंत १८ वनडे सामने खेळले असून यात २४३ धावा केल्या आहेत आणि ७ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने २५ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले असून ३९३ धावा यात केल्या आहेत आणि १५ विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय त्याने ३ कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्याने २४ धावा केल्या असून ४ विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

इंग्लंड दौरा ‘कर्णधार’ विराट कोहलीसाठी ठरणार लाभदायी; ‘हे’ ३ मोठे विक्रम करु शकतो नावावर

फलंदाजी, गोलंदाजी अन् क्षेत्ररक्षण; तिन्हीतही परफेक्ट असणारा ‘हा’ खेळाडू WTC फायनलमध्ये ठरेल एक्स फॅक्टर

फिरकीपटू चहलचे मोठे विधान; म्हणाला, ‘आयपीएल स्थगित झाली नसती तरीही सोडून जाणारचं होतो’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---