---Advertisement---

IND vs ENG: साई सुदर्शन नाही तर ‘या’ खेळाडूला संधी द्या! माजी दिग्गजाची मॅनेजमेंटला विनंती

On: गुरूवार, जून 19, 2025 9:13 PM
---Advertisement---

India vs England Test Series: भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेचा थरार उद्यापासून (20 जून) सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना हेडिंग्ले, लीड्स येथे खेळला जाईल. इंग्लंडने या धमाकेदार सामन्यासाठी आपल्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. दुसरीकडे, भारतीय संघ कोणत्या प्लेइंग इलेव्हनसोबत मैदानात उतरेल, हे अद्याप स्पष्ट नाही.

भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनच्या घोषणेपूर्वी, भारताचे माजी स्टार खेळाडू मोहम्मद कैफने (Mohammad Kaif) भारतीय व्यवस्थापनाला खास सल्ला दिला आहे. त्याने म्हटले आहे की, लीड्स कसोटीत साई सुदर्शनऐवजी अभिमन्यू ईश्वरनला संधी मिळायला हवी.

भारतीय संघाचे माजी खेळाडू मोहम्मद कैफ यांनी त्यांच्या अधिकृत ‘एक्स’ अकाउंटवर पोस्ट शेअर करत भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार शुबमन गिल (Shubman Gill) यांना विनंती केली आहे की, “साई सुदर्शन आधी अभिमन्यू ईश्वरनला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळायला हवी. ईश्वरनची 27 प्रथम श्रेणी शतके आणि 8 हजारहून अधिक धावांचा सन्मान व्हायला हवा. सरफराज खानला संघाबाहेर ठेवून निवडकर्त्यांनी आधीच चूक केली आहे. ईश्वरनला लीड्स कसोटीतून बाहेर ठेवून त्यांनी ही चूक पुन्हा करू नये.” (Mohammad Kaif Statement)

कैफने आपल्या पोस्टद्वारे हे स्पष्ट केले आहे की, त्याला सरफराज खानला लीड्स कसोटीत खेळताना पाहायचे होते. पण, सरफराज खानला भारतीय संघाच्या सध्याच्या संघात संधी देण्यात आलेली नाही. अभिमन्यू ईश्वरन गेल्या बऱ्याच काळापासून भारताच्या कसोटी संघात आहे. तरीही त्याला अद्याप पदार्पणाची संधी मिळालेली नाही. ईश्वरनच्या पदार्पणाची चाहतेही वाट पाहत आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या वरिष्ठ खेळाडूंच्या निवृत्तीनंतर, यावेळी ईश्वरनला इंग्लंडमध्ये कसोटी पदार्पणाची संधी मिळेल अशी सर्वांना आशा आहे. पण प्रशिक्षक आणि कर्णधार काय निर्णय घेणार? हे पाहणेदेखील महत्वाचे ठरेल. (Abhimanyu Easwaran Debut)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---