टी20 विश्वचषक 2022च्या स्पर्धेत भारताची निराशा झाली. यामुळे भारताला आयसीसी ट्रॉफी जिंकण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार. ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत भारताला इंग्लंडकडून उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर भारताकडे पुन्हा एकदा आयसीसी स्पर्धा जिंकण्याची संधी आहे, कारण 2023चा वनडे विश्वचषक भारतात खेळला जाणार आहे. या स्पर्धेला अनुसरूनच भारताच्या दिग्गजाने महत्वाचे विधान केले आहे. तसेच त्याने गोलंदाजीसाठी पर्यायही सुचविले आहेत.
तिसऱ्यांदा वनडे विश्वचषकाचा चॅम्पियन या हेतूने भारतीय संघ कशी तयारी करतो याकडे सर्वांचे लक्ष आहे. एफटीपीच्या कॅलेंडरनुसार भारत विश्वचषकाच्या आधी 25 वनडे सामने खेळणार आहे, ज्यामधील दोन सामने खेळून झाले आहेत. यावरून भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ याने संघ व्यवस्थापकांनी लवकरात लवकर खेळाडू निवडले पाहिजे.
प्राईम व्हिडियोमध्ये कैफ म्हणाला, “इंग्लंडने ज्या परिस्थितीत विश्वचषक जिंकला, त्यांचे सरासरी वय 31 वर्ष होते. यामुळे अनुभवी खेळाडू संघात असणे आवश्यक आहे. संघात अनुभवी खेळाडू असल्याचा फायदाच होतो आणि भारताला तसा प्रयोग न्यूझीलंड दौऱ्यातच सुरू करावा. कारण वनडे सामने मोजकेच शिल्लक आहेत, कारण विश्वचषकापर्यंत भारताला केवळ 25 सामनेच खेळायचे आहेत.”
कैफने भारताच्या गोलंदाजीला मोठी अडचण म्हटले आहे. हे सांगताना त्याने वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याचे उदाहरण दिले. तो भारताच्या वनडे संघाचा भाग नाही.
“मोठी चिंता गोलंदाजी आहे. न्यूझीलंडच्या दौऱ्यात दुसरा वनडे शार्दुल खेळला नाही आणि मोहम्मद सिराज याला माघारी पाठवले आहे, जो वनडे क्रिकेट खेळू शकतो. तसेच भुवनेश्वर संघात का नाही हे मला समजले नाही. तो एक चांगला गोलंदाज आहे. नव्या खेळाडूंच्या शोधात जुन्या खेळाडूंना गमावून बसत आहोत. एक म्हण आहे, ‘हीरे की तलाश में सोना खो दिया'”, असेही कैफने पुढे म्हटले.
यावेळी कैफने सल्लाही दिला आहे. आता वेगवेगळे प्रयोग करण्याची वेळ नाही असे सुचवताना तो म्हणाला, “एकच वनडे संघ कायम ठेवा कारण वेळ निघून जाईल आणि स्पर्धा लवकरच सुरू होईल.” त्याने युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिक याचेही कौतुक केले. उमरानने नुकतेच भारताच्या वनडे संघात पदार्पण केले आहे. Mohammad Kaif said the main problem of Team India ICC ODI World Cup 2023
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऋतुराजने सात षटकार ठोकलेला ‘तो’ गोलंदाज कोण? यापूर्वीही आलेला चर्चेत
VIDEO: आयपीएल संघांनो सावधान! ऋतुराजने एका ओव्हरमध्ये ठोकलेत तब्बल 7 षटकार