---Advertisement---

‘तर धोनी महान क्षेत्ररक्षकही झाला असता’, कैफने शेअर केलेला जुना व्हिडीओ

---Advertisement---

महेंद्रसिंग धोनी जगातील महान यष्टीरक्षकांपैकी एक आहे. त्याने आपल्या हुशारीने आणि चपळाईने यष्टीमागे आपला ठसा उमटवला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुरुवात करताना धोनीकडे सर्वोत्तम तंत्र नव्हते, अशी टीका झाली. पण, वेळ आणि अनुभवाने तो सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक बनला. धोनी स्टंपच्या मागे आपल्या वेगामुळे ओळखला जातो आणि त्याने खेळाच्या तीनही प्रकारात यष्टीमागे मागे ८२९ बळी घेतले आहेत.

यष्टीरक्षक आणि कर्णधार म्हणून त्याने केलेले कारनामे क्रिकेटच्या इतिहासात नोंदले गेले आहेत, पण भारताचा माजी फलंदाज आणि धोनीचा माजी सहकारी मोहम्मद कैफ याने मागीलवर्षी एक व्हिडिओ शेअर करत म्हटले होते की भारताचा माजी कर्णधार एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक होता. कैफ जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक आहे. काही काळापूर्वी त्याने धोनीच्या एका उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा व्हिडिओ शेअर केला.

हा व्हिडिओ भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय सामन्याचा आहे, ज्यात त्याने आणि धोनीने मिळून एक शानदार रनआउट केला होता. कैफने धोनीसोबत ड्रेसिंग रूममध्ये बराच वेळ घालवला आहे. जर धोनी यष्टीरक्षक नसता तर तो देखील एक महान क्षेत्ररक्षक झाला असता, असा विश्वास कैफने व्यक्त केला आहे.

व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की फलंदाज कव्हर्सवर एक फटका मारतो आणि धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना धोनी लगेच चेंडू पकडण्यासाठी जातो आणि चेंडू स्टंपकडे फेकतो, त्याचवेळी शॉर्ट लेगवर क्षेत्ररक्षण करणारा कैफ धोनीच्या थ्रोवर तो चेंडू वेगाने पकडतो आणि फलंदाजास बाद करतो.

हा व्हिडिओ शेअर करताना कैफने लिहिले- ‘मला वाटते एमएसडी मैदानावर कुठेही असला, तरी तो एक चांगला क्षेत्ररक्षक ठरला असता, आणि मी ही कदाचित चांगला यष्टीरक्षक झालो असतो.’

https://twitter.com/MohammadKaif/status/1303593510222704640

महेंद्रसिंग धोनीने गेल्या वर्षी १५ ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटले होते. धोनीने भारतासाठी ३५० एकदिवसीय, ९० कसोटी आणि ९८ टी -२० खेळले आहेत. आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात तो चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना दिसणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘अशी’ चार कारणे ज्यामुळे विराटने सोडले टी२० संघाचे नेतृत्व

आयपीएल २०२१: ‘हे’ ३ खेळाडू यूएईमध्ये पाडू शकतात धावांचा पाऊस, एका परदेशी खेळाडूचाही समावेश

पांडेने ठोकला उत्तुंग षटकार, मात्र नंतर टॉर्च लावून शोधावा लागला चेंडू, पाहा मजेदार व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---