अफगाणिस्तानच्या संघाने सोमवारी (२५ ऑक्टोबर) टी-२० विश्वचषकात शानदार सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यात त्यांनी स्कॉटलंड संघाचा १३० धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. अफगाणिस्तानचे खेळाडू कठीण परिस्थितीतही क्रिकेटच्या माध्यमातून स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत काही खेळाडू असे आहेत जे अडचणीतही लोकांना हसवण्यात आणि त्यांचे मनोरंजन करण्यात व्यस्त झाले आहेत. असाच काहीसा किस्सा अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबीने स्कॉटलंडला पराभूत केल्यानंतर केला आहे. स्कॉटलंडविरुद्ध सामना जिंकल्यानंतर पत्रकार परिषदेत त्याने स्वतःला ट्रोल केले.
सुपर १२ च्या आपल्या पहिल्या लढतीत स्कॉटलंडविरुद्ध सामना जिंकल्यानंतर अफगाणिस्तान संघाचा कर्णधार मोहम्मद नबी पत्रकार परिषद घेण्यासाठी आला होता. पत्रकार परिषदेत आल्यावर नबी म्हणाला, “सगळ्यात अवघड काम आहे हे भाऊ. किती प्रश्न आहेत? ५ मिनिटात माझे इंग्रजी संपेल, भाऊ.” स्वतःला अशा पद्धतीने ट्रोल केल्याने उपस्थित लोकांमध्ये एकच हशा पिकला. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. क्रिकेट चाहते यावर लाईक्स आणि कंमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.
तत्पूर्वी स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी राष्ट्रगीत सुरू असताना नबी भावूक झाला होता. एवढ्या मोठ्या स्पर्धेत नबी पहिल्यांदाच संघाचे नेतृत्व करत आहे. राशिद खानचे कर्णधारपद सोडल्यानंतर त्याला हे कर्णधारपद मिळाले आहे.
https://twitter.com/abdulwahabdr02/status/1452856153063493636?s=20
संघ निवडीत सल्लामसलत न केल्यामुळे राशिदने कर्णधारपद सोडले होते. रशीदने ट्विट करून म्हटले होते की, ‘एक कर्णधार आणि देशाचा जबाबदार नागरिक म्हणून मला संघ निवडीत असण्याचा अधिकार आहे. निवड समिती आणि एसीबीने संघ निवडण्यापूर्वी माझे मत घेतले नाही. मी माझे मत नक्कीच दिले असते. अफगाणिस्तान टी-२० चे कर्णधारपद भूषवणे, अफगाणिस्तानसाठी खेळणे माझ्यासाठी नेहमीच अभिमानाची गोष्ट राहिली आहे.’ यानंतर अफगाणिस्तान संघाचा मोहम्मद नबी कर्णधार झाला.
नबीच्या नेतृत्त्वाखालील पहिल्याच टी२० विश्वचषक सामन्यात संघाने विजय मिळवला. स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात नजीबुल्ला जद्रानने ५९ आणि हजरान झझाईने ४४ धावा केल्या. त्याचवेळी रहमुल्ला गुरबाजने ४६ धावांची खेळी केली. त्याचवेळी गोलंदाजीत देखील अफगाणिस्तानने दमदार कामगिरी केली. आपला पहिला टी-२० विश्वचषक खेळणाऱ्या मुजीब उर रहमानने चार षटकांत २० धावा देत ५ बळी घेतले. त्याचवेळी राशिदने चार षटकात ९ धावा देत ४ बळी घेतले.
या विक्रमी विजयानंतर अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबी म्हणाला, “आमची योजना प्रथम फलंदाजी करून विरोधी संघासमोर मोठी धावसंख्या उभी करण्याची होती. आमच्या सलामीवीरांनी पॉवरप्लेमध्ये संघाला चांगली सुरुवात करून दिली. गुरबाज आणि झद्रान यांनी चांगली सुरुवात केली. त्यांनी ज्याप्रकारे चांगल्या स्ट्राइक रेटने धावा केल्या ते कौतुकास्पद आहे. रशीद आणि मुजीब हे जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहेत हे सर्वांना माहीत आहे. आमच्या संघात बरेच चांगले खेळाडू आहेत आणि मला आशा आहे की आम्ही असेच जिंकत राहू.”
महत्त्वाच्या बातम्या-
हॅरिस रौफचा ‘खौफ’, १४९ किमी दर ताशीच्या वेगवान चेंडूने मार्टिन गप्टिलला केले चारो खाने चित- VIDEO
एकच विकेट घेतली, पण सॉलिड घेतली; आझमच्या बत्त्या गुल करत साऊदीची टी२०त विकेट्सची ‘सेंच्यूरी’
अरे, हे काय झालं? शोएब मलिकला अडवता आला नाही साधा चेंडू, गप्टिलला फुकटात दिल्या ४ धावा






