टी-२० विश्वचषक २०२१ मध्ये मंगळवारी (२६ ऑक्टोबर) पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना पार पडला. हा सामना शारजाह क्रिकेट स्टोडियमवर खेळला गेला. पाकिस्तानने सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात पाकिस्तान संघाच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले आणि प्रथम फलंदाजी केलेल्या न्यूझीलंडला मर्यादित २० षटकांमध्ये ८ विकेट्सच्या नुकसानावर १३४ धावांवर रोखले. सामन्यादरम्यान पाकिस्तानच्या गोलंदाजीवेळी शोएब मलिकने खराब क्षेत्ररक्षणाचे प्रदर्शन केले आणि त्याच्या हातातून सुटलेल्या एका चेंडूमुळे मर्टिन गप्टिलच्या खात्यात चार धावांची भर पडली.
न्यूझीलंडच्या फलंदाजीवेळी चौथ्या षटकात इमाद वसीम गोलंदाजी करत होता. त्याच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर मार्टिन गप्टिने एक कट शॉट मारला, जो पॉइंटच्या दिशेने गेले. या ठिकाणी सामन्याच्या सुरुवातीपासून शोएब मलिक क्षेत्ररक्षण करत होता. गप्टिलने मारलेल्या शॉटनंतर असे वाटले की, शोएब तो चेंडू अडवेल. पण चेंडूचा वेग जास्त असल्यामुळे त्याला तो चेंडू अडवता आला नाही. चेंडू त्याच्या पायांच्या मधून गेला आणि थेट सीमारेषेबाहेर पोहोचला.
चेंडू हातातून सुटल्यानंतर शोएब विचारात पडला असावा की, चेंडू सुटला तरी कसा? तसेच दुसरीकडे गोलंदाजी करणारा इमादही चेंडू सीमारेषेपार गेल्यामुळे हैराण झालेला दिसला. आयसीसीने हा व्हिडिओ शेअर केला आहे आणि चाहत्यांमध्ये तो वेगाने व्हायरल होत आहे.
दरम्यान, सामन्यात पाकिस्तान संघासाठी हरिस रौफने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. तसचे त्याने त्याच्या चार षटकांच्या स्पेलमध्ये ५.५० च्या उत्कृष्ठ इकोनॉमीने केवळ २२ धावा दिल्या. न्यूझीलंडसाठी डारले मिशेल २७ केन विलियम्सन २५ आणि डेवॉन कोनवेने २७ धावांची खेळी केली. न्यूझीलंडच्या १३५ धावांंच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाने १९ षटकांमध्ये ५ विकेट्स राखून विजय मिळवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानविरुद्ध न्यूझीलंडचा कर्णधार विल्यम्सनचे खास ‘अर्धशतक’; धोनी, मॉर्गनच्या क्लबमध्ये समावेश
‘बाबर आझम आणि कंपनी’चा विजयरथ सुसाट, भारतानंतर न्यूझीलंडला ५ विकेट्सने चारली धूळ
शमीच नव्हे ‘या’ दिग्गजालाही करावा लागलेला चाहत्यांच्या रोषाचा सामना, स्वत:ला घरामध्ये केले होते कैद