पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या मोहम्मद नबीनं एकही षटक टाकलं नाही. सामन्यादरम्यान अनेक जाणकारांनी यावर आश्चर्य व्यक्त केलं होतं. आता अफगाणिस्तानच्या या दिग्गज खेळाडूनं यावर प्रतिक्रिया दिली आहे.
नबीनं त्याच्या एका चाहत्याची पोस्ट इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केली होती. पोस्टमध्ये नबीला गोलंदाजी न देण्याच्या कर्णधाराच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. नबीनं यावर आपल्या बाजूनं काहीही लिहिलं नाही, मात्र अशी पोस्ट शेअर करून त्यानं आपली नाराजी व्यक्त केल्याचं मानलं जात आहे. काही काळानंतर त्यानं ही पोस्ट काढून टाकली. यावरून मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये सर्व काही ठीक नसल्याचा अंदाज लावला जात आहे.
अफगाणिस्तानातील अनेक चाहत्यांनी मोहम्मद नबीच्या समर्थनार्थ पोस्ट शेअर केल्या आहेत. एका चाहत्यानं त्याला पंजाबविरुद्ध एकही षटक न देण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या पोस्टमध्ये त्यानं मुंबई इंडियन्सला उद्देशून लिहिलं की, “तुमच्या कर्णधाराचे काही निर्णय खूप विचित्र होते. याचं लोकांनाही आश्चर्य वाटलं. नबीनं आज गोलंदाजी केली नाही”
मोहम्मद नबीनं ही पोस्ट आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली होती. पोस्टमध्ये नबीची स्तुतीही करण्यात आली होती. पोस्टमध्ये लिहिलं होतं, “गेम चेंजर! अत्यंत महत्त्वाच्या प्रसंगी दोन विकेट आणि एक रनआउट”. मोहम्मद नबीनं दोन तासांनंतर आपल्या इन्स्टाग्रामवरून ही स्टोरी काढून टाकली.
Mohammad Nabi’s Instagram story. pic.twitter.com/Rk4qWoIOsl
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 19, 2024
नबीनं त्याच्या इन्स्टाग्रामवरून ही स्टोरी काढून टाकली असली तरी अनेक क्रिकेट चाहत्यांनी त्याचे स्क्रीनशॉट्स घेतले होते. आता हा स्क्रीन शॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहत्यांनी ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याबद्दल अनेक पोस्ट केल्या आहेत. हार्दिक पांड्याला कर्णधार बनवण्याच्या निर्णयावर मुंबई इंडियन्स कॅम्पमधील कोणीही खूश नसल्याचं एका पोस्टमध्ये लिहिलं आहे.
तसं पाहिलं तर, हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेक प्रसंगी त्यानं फलंदाजी आणि गोलंदाजीत केलेल्या बदलांवर प्रश्न उपस्थित केले गेले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
पंजाबविरुद्ध मुंबई इंडियन्सनं केली चीटिंग? डगआऊटमधून दिला रिव्ह्यू घेण्याचा इशारा; नक्की काय घडलं?
‘इम्पॅक्ट प्लेअर’ नियम भारतासाठी धोकादायक! जहीर खाननं उपस्थित केले अनेक प्रश्न, म्हणाला…