---Advertisement---

रिझवान विरुद्ध यान्सेन, लाईव्ह सामन्यात पाकिस्तान-आफ्रिकेच्या खेळाडूंमध्ये खडाजंगी

Debate between Mohammad Rizwan and Marco Jansen
---Advertisement---

पाकिस्तान संघ शुक्रवारी (27 ऑक्टोबर) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकला. मात्र, वरच्या फळीतील फलंदाज अपेक्षित प्रदर्शन करू शकले नाहीत. संघाची धावसंख्या 141 असताना भारताच्या पहिल्या पाच विकेट्स पडल्या होत्या. यादरम्यान, मोहम्मद रिझवान आणि मार्को यान्सेन यांच्यातील वातावरण तापल्याचे दिसले.

पाकिस्तानच्या डावातील सातव्या षटकात इमाम उल हक याच्या रुपात दुसरा झटका संघाला बसला होता. मार्को यान्सेन () यानेही ही विकेट घेतली होती. त्यानंतर षटकातील पाचव्या चेंडूवर मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) याने चौकार मारला. या चेंडूनंतरच गोलंदाजी करणारा यान्सेन आणि रिझवानमध्ये शाब्दिक चकमक झाली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असूुन रिझावन त्याला स्वतःचे काम कर असे सांगताना दिसत आहे.

दरम्यान, उभय संघांतील या सामन्यात पाकिस्तानने प्रथम घलंदाजीचा निर्णय घेतला असला, तरी दक्षिण आफ्रिकेच्या भेदक गोलंदाजीसमोर त्यांचे सुरुवातीचे फलंदाज टिकू शकले नाहीत. एकडा बाबर आझम समोडला तर पहिल्या चारही विकेट्स पाकिस्तानने स्वस्तात गमावल्या. (Mohammad Rizwan and Marko Jansen argue in live match)

उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
पाकिस्तान – अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, शादाब खान, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम ज्युनिअर, हरिस रौफ

दक्षिण आफ्रिका – क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा (कर्णधार), रासी व्हॅन डर ड्युसेन, एडेन मार्करम, हेन्रीच क्लासेन, डेविड मिलर, मार्को यान्सेन, जेराल्ड कोएट्झी, केशव महाराज, तबरेझ शम्सी, लुंगी एन्गिडी

महत्वाच्या बातम्या – 
‘मेरी वाली अलग है, असं कधीच…’, रिलेशनशिपविषयी धोनीचा तरुणांना मजेशीर सल्ला, Video Viral 
भारतीय खेळाडूंनी सराव सत्रात दाखवला दम; प्रमुख फलंदाजांनीही केली गोलंदाजी,पाहा व्हिडीओ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---