‘थाला’, ‘माही’, ‘कॅप्टन कूल’ अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखला जाणारा दिग्गज भारतीय खेळाडू म्हणजे महेंद्र सिंग धोनी होय. एमएस धोनी याला आज कुठल्याच परिचयाची गरज नाही. धोनीची गणना भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये होते. तो जगातील अशा एकमेव कर्णधार आहे, ज्याने आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी जिंकल्या आहेत. धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन आता 3 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. मात्र, आजही चाहत्यांचे त्याच्यावरील प्रेम तसूभरही कमी झाले नाहीये. 42 वर्षीय धोनी नेहमीच सहकाऱ्यांना सल्ला देताना दिसतो, ज्यामुळे त्यांना सामन्यात मोठा फायदा मिळतो. अशात त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात तो तरुणांना रिलेशनशिपविषयी सल्ला देताना दिसत आहे.
धोनीचा सल्ला
अलीकडेच एमएस धोनी (MS Dhoni) एका कार्यक्रमात सहभागी झाला. यादरम्यान त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीपासून ते आयपीएल कारकीर्दीशी संंबंधित अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे दिली. यादरम्यानच धोनीने आजकालच्या तरुण मुलांना सल्ला देताना म्हटला की, “जर तुम्हाला आयुष्यात असे कुणी मिळाले आहे, ज्याच्यासोबत राहून तुम्हाला आनंद मिळतोय. तेव्हा कृपया तुम्ही त्याच्यासोबत लग्न करा. जे इथे बॅचलर आहेत, त्यांनी नेहमी हा गैरसमज असतो की, जो मी दूर करू इच्छितो. असा विचार कधीच करू नका की, माझी वाली वेगळी आहे.”
🤣🤣@msdhoni pic.twitter.com/D2Sg4WIUXt
— Raghu (@meerkali7781) October 26, 2023
धोनीने हा सल्ला देताच सर्वत्र एकच हशा पिकला. आता धोनीचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. तसेच, चाहते या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
निवृत्तीविषयी काय म्हणाला धोनी?
धोनीने आपल्या आंतरराष्ट्रीय निवृत्तीविषयी बोलताना म्हटले की, “माझ्यासाठी तो भारतासाठी खेळण्याचा अखेरचा दिवस होता. मी एक वर्षानंतर निवृत्ती घेतली, पण सत्य हेच आहे की, मी त्याच दिवशी निवृत्त झालो होतो. मात्र, मला त्यावेळी निवृत्तीची घोषणा करायची नव्हती.”
धोनीने 2019च्या विश्वचषकातील उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध आपला अखेरचा सामना खेळला होता. या सामन्यात भारत 18 धावांनी पराभूत झाला होता. त्या सामन्यात धोनी धावबाद झाल्यामुळे कोट्यवधी चाहत्यांना धक्का बसला होता. धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नसला, तरीही तो आयपीएलमध्ये खेळताना दिसतो. तो आयपीएल 2024 स्पर्धेतही खेळताना दिसण्याची शक्यता आहे. (former captain ms dhoni gave important advice to young boys regarding relationships see video)
हेही वाचा-
‘एकटा कर्णधार विश्वचषक जिंकू शकला असता, तर…’, गंभीरचा पुन्हा एकदा धोनीवर निशाणा, पण सोशल मीडियावर ट्रोल
IND vs ENG: फलंदाजांची बॅट तळपणार की, गोलंदाज उडवणार दांड्या? लखनऊमध्ये हारायचाच नाही टॉस, वाचलंच पाहिजे