ODI World Cup 2023क्रिकेटटॉप बातम्या

‘मी तर त्याच दिवशी निवृत्त झालेलो, पण…’, 3 वर्षांनंतर धोनीचा गौप्यस्फोट, सांगितली Retirementची खरी तारीख

भारतीय संघाला आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी जिंकून देणारा कर्णधार म्हणजे एमएस धोनी होय. धोनीने 15 ऑगस्ट, 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्याने एक शानदार सोशल मीडिया पोस्ट शेअर करत सर्वांना धक्का दिला होता. मात्र, धोनीने निवृत्तीचा निर्णय नक्की कधी घेतला होता, हे सर्वांना माहितीये. कारण, त्याने त्याचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना 2019च्या विश्वचषकात खेळला होता. आता 3 वर्षे उलटल्यानंतर धोनीने मोठा खुलासा केला आहे.

धोनीने सांगितली निवृत्तीची तारीख
एमएस धोनी (MS Dhoni) याने एका कार्यक्रमात आपल्या निवृत्तीविषयी खुलासा केला. त्याने 2019च्या विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पराभवानंतर स्वत:ला निवृत्त मानले होते. या सामन्यात तो धावबाद झाला होता. हा 2019च्या विश्वचषकातील उपांत्य सामना होता. तो धावबाद झाल्यामुळे कोट्यवधी भारतीय निराश झाले होते. मात्र, त्याने निवृत्तीची घोषणा करण्यासाठी खूपच वेळ घेतला होता.

तीन वर्षांनंतर खुलासा
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तो एका कार्यक्रमात आपल्या निवृत्तीविषयी बोलताना दिसत आहे. व्हिडिओत धोनी म्हणताना दिसत आहे की, “जेव्हा तुम्ही एक जवळचा सामना गमावता, तेव्हा भावनांवर नियंत्रण करणे कठीण असते. माझ्यासाठी तो भारतासाठी खेळण्याचा शेवटचा दिवस होता. मी एक वर्षानंतर निवृत्ती घेतली. मात्र, सत्य हे आहे की, मी त्याच दिवशी निवृत्त झालो होतो, पण मला त्यावेळी निवृत्तीची घोषणा करायची नव्हती.”

‘अशी’ कामगिरी करणारा जगातील एकमेव कर्णधार
महेंद्र सिंग धोनीने 23 डिसेंबर, 2004मध्ये बांगलादेशविरुद्ध वनडे पदार्पण केले होते. यानंतर धोनी सप्टेंबर 2007मध्ये पहिल्यांदा भारतीय संघाचा कर्णधार बनला होता. त्याने भारताला 2007 सालचा टी20 विश्वचषक, 2011चा वनडे विश्वचषक आणि 2013ची चॅम्पियन्स ट्रॉफी असे तीन किताब संघाला जिंकून दिले होते. आयसीसीच्या तीन ट्रॉफी जिंकणारा धोनी जगातील एकमेव कर्णधार आहे. (former captain ms dhoni statment on his shock announcement of retirement from international cricket 2023 read)

हेही वाचा-
बलाढ्य इंग्लंडच्या नांग्या ठेचताच लंकन कर्णधाराने भरली हुंकार; म्हणाला, ‘आम्ही जर सलग 3 सामने…’
इंग्लंडची शिकार करत श्रीलंकेने Points Tableमध्ये घेतली गरुडझेप, पाकिस्तानलाही दिला धक्का; वाचाच

Related Articles