वनडे विश्वचषक 2023 या महाकुंभमेळ्यातील 25वा सामना गतविजेत्या इंग्लंड विरुद्ध श्रीलंका संघात गुरुवारी (दि. 26 ऑक्टोबर) पार पडला. या सामन्यात इंग्लंडला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. श्रीलंकेने बलाढ्य इंग्लंडला 8 विकेट्सने पराभवाची धूळ चारली. या विजयानंतर श्रीलंकेने विश्वचषक 2023 पॉईंट्स टेबलमध्ये गरुडझेप घेतली. तसेच, इंग्लंड पुन्हा तळाशी पोहोचला.
या सामन्यात इंग्लंड (Englands) संघाने प्रथम फलंदाजी करताना 33.2 षटकात दहाच्या दहा विकेट्स गमावत फक्त 156 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेने पथुम निसांका (नाबाद 77) आणि सदीरा समरविक्रमा (65) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर 25.4 षटकातच 2 बाद 160 धावा केल्या. अशाप्रकारे श्रीलंकेने हा सामना 8 विकेट्सने खिशात घातला. या विजयामुळे विश्वचषक 2023 पॉईंट्स टेबलमध्ये (World Cup 2023 Points Table) श्रीलंकेला मोठा फायदा झाला. तसेच, इंग्लंड संघ जवळपास विश्वचषकातून बाहेर पडला आहे.
विजयानंतर श्रीलंकेला फायदा
इंग्लंडविरुद्ध झालेल्या शानदार विजयानंतर श्रीलंका संघ पॉईंट्स टेबलमध्ये (Point Table) फायदा झाला. श्रीलंकेने 4 गुण मिळवत पाकिस्तानला पछाडत पाचवे स्थान मिळवले. त्यामुळे पाकिस्तानचे नुकसान झाले. पाकिस्तानची सहाव्या स्थानी घसरण झाली.
Sri Lanka have joined the race for a spot in the #CWC23 semi-final 🏆 pic.twitter.com/w1iaiEejRV
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) October 27, 2023
या पराभवानंतर इंग्लंड संघ पॉईंट्स टेबलमध्ये नवव्या स्थानी घसरला आहे. इंग्लंड संघाच्या खात्यात 5 सामन्यात फक्त 1 विजय आणि 4 पराभवांचा समावेश आहे. यादरम्यान त्यांचे गुण फक्त 2 आहेत. जर इंग्लंडला उपांत्य सामन्यात पोहोचायचे असेल, तर त्यांना आपल्या उरलेल्या सर्व सामन्यात विजय मिळवावा लागेल. तरीही त्यांचे अंतिम 4 संघांमध्ये पोहोचणे खूपच कठीण आहे.
लाहिरू कुमाराच्या 3 विकेट्स
या सामन्यात लाहिरू कुमारा चमकला. कारण, त्याने 7 षटकात 35 धावा खर्चून सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. लाहिरूने विश्वचषक 2023मध्ये पहिल्यांदा इंग्लंडविरुद्ध खेळत मैफील लुटली. त्याच्या कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. दुसरीकडे, श्रीलंकेची फलंदाजी चांगली झाली. सुरुवातीच्या दोन विकेट्स पडल्यानंतर निसांकाने 54 चेंडूत अर्धशतक केले. तसेच, समरविक्रमानेही अर्धशतक ठोकले. दोघांमध्ये नाबाद 137 धावांची शतकी भागीदारी झाली. (cwc23 points table sri lanka jumps one place up to fifth spot in world cup 2023 after defeating england)
हेही वाचा-
पराभवाच्या हॅट्रिकनंतर बटलरचे धक्कादायक विधान; म्हणाला, ‘प्रामाणिकपणे सांगतो, तुम्ही रातोरात खराब…’
पाकिस्तान कमबॅक करणार की द.आफ्रिका गाठणार अव्वलस्थान? चेन्नईत रंगणार हाय व्होल्टेज सामना