आयसीसी वनडे विश्वचषक 2023 गतविजेत्या इंग्लंड संघासाठी खूपच खराब ठरताना दिसत आहे. गुरुवारी (दि. 26 ऑक्टोबर) इंग्लंडला श्रीलंका संघाने 8 विकेट्सने पराभवाचा धक्का दिला. अशाप्रकारे इंग्लंडने स्पर्धेत पराभवाची हॅट्रिक केली. या पराभवानंतर इंग्लंडचे स्पर्धेतून बाहेर पडणे जवळपास निश्चित आहे. त्यांनी आतापर्यंत 5 पैकी 4 सामने गमावले आहेत. या खराब प्रदर्शनानंतर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर खूपच निराश झाला आहे. त्याने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यानंतर संघाच्या चुका सांगत स्वत:लाही दोष दिला.
काय म्हणाला बटलर?
दारुण पराभवानंतर जोस बटलर (Jos Buttler) म्हणाला, “अविश्वसनीयरीत्या ही खूपच कठीण आणि निराशाजनक स्पर्धा राहिली आहे. मी स्वत:शी निराश आहे आणि इतर खेळाडूही स्वत:शी निराश आहे. कारण, आम्ही चांगले प्रदर्शन केले नाहीये. मी आमच्या खेळाडूंच्या प्रयत्नातील चुका सांगत नाहीये, पण हे स्पष्ट आहे की, आम्ही आमचे सर्वोत्तम प्रदर्शन करण्यात खूपच मागे पडलो. माझ्याकडे संघाच्या या खराब प्रदर्शनासाठी सध्या कोणतेही योग्य उत्तर नाहीये. एक कर्णधार म्हणून तुम्हीही चांगले प्रदर्शन करून संघाला पुढे घेऊन जाऊ इच्छिता, पण मी ही भूमिका निभावण्यात खूपच मागे पडलो.”
संघातील आत्मविश्वास कमी होण्याविषयी बटलरचे विधान
बटलर पुढे म्हणाला की, “प्रामाणिकपणे सांगायचं झालं, तर असं काही नाहीये. आमच्या संघात अनेक अनुभवी खेळाडू आहेत. त्यांनी आधीही अशाप्रकारच्या परिस्थितीचा सामना केला आहे. तुम्ही रातोरात एक खराब खेळाडू बनत नाहीत. आमच्यासाठी सर्वात मोठी निराशा ही आहे की, आम्ही आमचा सर्वोत्तम खेळ करण्यापासून खूप मागे राहिलो. याव्यतिरिक्त इतर कोणतेही कारण मला सध्यातरी दिसत नाहीये.”
रणनीती आणि निवडीवर बटलरचे भाष्य
संघाची निवड आणि रणनीतीविषयी बोलताना बटलर म्हणाला, “संघनिवड आमची समस्या राहिली नाहीये. आमची समस्या प्रदर्शन न करणे आहे. मैदानावर संघाचे जे खेळाडू उपस्थित राहिले, ते निश्चित मानकांच्या हिशोबाने खूपच दूर राहिले. ज्याप्रकारच्या चुका आम्ही केल्या, सामान्यत: आम्ही असे करत नाही. एवढंच काय, तर आम्ही बेसिक गोष्टीही व्यवस्थित करू शकलो नाहीत.”
सामन्याचा आढावा
या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. हाच निर्णय त्यांच्या अंगलट आला. त्यांचा संपूर्ण डाव 33.2 षटकात 156 धावांवर संपुष्टात आला. हे आव्हान श्रीलंकेने 25.4 षटकात 2 विकेट्सच्या मोबदल्यात 160 धावा करून पूर्ण केले. अशाप्रकारे श्रीलंकेने हा सामना 8 विकेट्सने जिंकला. (captain jos buttler on england poor performance in world cup 2023 eng vs sl read)
हेही वाचा-
पाकिस्तान कमबॅक करणार की द.आफ्रिका गाठणार अव्वलस्थान? चेन्नईत रंगणार हाय व्होल्टेज सामना
IPL 2024 लिलावासाठी संघांना मिळणार 100 कोटी, ‘या’ खेळाडूंचा सहभाग पक्का