---Advertisement---

IPL 2024 लिलावासाठी संघांना मिळणार 100 कोटी, ‘या’ खेळाडूंचा सहभाग पक्का

---Advertisement---

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेची रंगत वाढत चालली आहे. अशातच दुसरीकडे भारतीय क्रिकेटमधील सण म्हटली जाणारी सर्वात मोठी टी20 लीग इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेची तयारीही सुरू झाली आहे. आयपीएल प्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. आगामी आयपीएलच्या लिलावा बाबत तसेच ट्रेडिंग विंडोबाबत माहिती उपलब्ध होत आहे.

आयपीएल 2024 लिलाव (IPL 2024 Auction) दुबई येथे होण्याची शक्यता आहे. तसेच, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या लिलावाचे आयोजन 15 ते 19 डिसेंबरदरम्यान होण्याची शक्यता आहे. तसेच, महिला प्रीमिअर लीग म्हणजेच डब्ल्यूपीएल स्पर्धेचा लिलाव 9 डिसेंबरला होऊ शकतो.

आयपीएल 2024 साठी ट्रेडिंग विंडो गुरुवारपासून (26 ऑक्टोबर) सुरू झाली. यामध्ये संघ दुसऱ्या संघाकडून खेळाडू आपल्याकडे ट्रान्सफर करू शकतात. यावर्षी आयपीएलचा मिनी लिलाव होणार आहे. यासाठी तब्बल 100 कोटी इतकी रक्कम प्रत्येक संघाला देण्यात येईल. मागील आयपीएलमध्ये हीच रक्कम 90 कोटी इतकी होती. याचाच अर्थ संघाच्या उर्वरित रकमेमध्ये पुढील रक्कम अधिक केली जाईल.

या लिलावात अनेक मोठे खेळाडू सहभागी होण्याची शक्यता आहे. यावर्षी आयपीएलमधून माघार घेतलेला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स पुढील हंगामात उपलब्ध होणार आहे. तसेच ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फटकेबाज ट्रेविस हेड, जोस इंग्लिस हे या लिलावाचा भाग असतील. इंग्लंड संघाचे ऍलेक्स हेल्स व ख्रिस वोक्स हे देखील यंदा आयपीएलमध्ये भाग घेण्यासाठी उत्सुक आहेत. सध्या सुरू असलेल्या विश्वचषकात आपल्या चमकदार कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेणारे रचिन रवींद्र, गेराल्ड कोएत्झे, बास डी लिडे व मेहदी हसन मिराज हे आयपीएल लिलावात मोठी रक्कम मिळवू शकतात.

(IPL 2024 Auction Updates Cummins Rachin De Leede Might Be There)

महत्वाच्या बातम्या 

आफ्रिदीला अजूनही आपल्या खेळाडूंवर आत्मविश्वास; म्हणाला, ‘विश्वचषक आपलाच…’‘इंग्लंडचे फलंदाज स्वत:च्या प्रतिष्ठेसाठी…’ गतविजेत्यांची खराब फलंदाजी पाहून गंभीरची लक्षवेधी प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---