---Advertisement---

आफ्रिदीला अजूनही आपल्या खेळाडूंवर आत्मविश्वास; म्हणाला, ‘विश्वचषक आपलाच…’

shaheen afridi
---Advertisement---

शाहीन शाह आफ्रिदी याने ट्विटरवर एक पोस्ट केली आहे, ज्यामध्ये त्याने विश्वचषक जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाने या विश्वचषकात आतापर्यंत अत्यंत खराब कामगिरी केली आहे. त्यांनी पहिला सामना नेदरलँड्सविरुद्ध आणि दुसरा श्रीलंकेविरुद्ध जिंकला, पण त्यानंतर भारत, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरुद्ध सलग तीनही सामने त्यांनी गमावले आहेत.

आता पाकिस्तान क्रिकेट संघाला उपांत्य फेरी गाठणे अशक्य असल्याचे दिसत आहे. मात्र, तरीही त्याच्या संघाने उर्वरित सर्व सामने जिंकले, तर ते उपांत्य फेरी गाठू शकतात. पाकिस्तान क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Shah Afridi) याने ट्विटरवर पाकिस्तान संघ अजूनही हा विश्वचषक जिंकू शकतो, अशी पोस्ट टाकून पाकिस्तानी चाहत्यांच्या मनात नवा आत्मविश्वास निर्माण केला आहे.

शाहीन शाह आफ्रिदीने आपल्या पोस्टमध्ये बाबर आझम (Babar Azam) याच्यासोबतचा फोटो शेअर केला आणि लिहिले, “भाऊ, आमच्यात एकता आहे. कितीही चढ-उतार असो, आम्ही एकत्र उभे आहोत आणि नेहमीच एकमेकांना मदत करतो. एकता ही अशी शक्ती आहे जी आम्हाला एकत्र बांधते. एक शक्तिशाली शक्ती जी काहीही साध्य करू शकते. विश्वचषक आमचा आहे, इंशाल्लाह. शुभेच्छा चँम्पियन्स.”

विश्वचषक 2023 स्पर्धेतील पुढचा प्रवास पाकिस्तान क्रिकेट संघासाठी सोपा नसेल, कारण त्यांना उर्वरित सामने दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, न्यूझीलंड आणि इंग्लंडविरुद्ध खेळायचे आहेत. अशा स्थितीत त्यांच्या 4 सामन्यांपैकी 3 सामने मोठ्या संघांविरुद्ध आहेत, तर बांगलादेशविरुद्धचा सामनाही सोपा नसेल. अशा स्थितीत पाकिस्तानला येथून उपांत्य फेरी गाठणे सोपे जाणार नाही. आता या विश्वचषकात पाकिस्तानचा संघ किती मजल मारतो हे पाहाने उत्सुकतेचे ठरणार आहे. (Afridi still has confidence in his players Said The World Cup is ours)

महत्वाच्या बातम्या

चिन्नास्वामीवरही इंग्लंडचे पानिपत! श्रीलंकेने उडवला 156 धावांत खुर्दा, मॅथ्यूजचे शानदार कमबॅकविराट इतका यशस्वी कसा झाला? गुपीताचा खुलासा करत स्वत:च म्हणाला, ‘प्रत्येक दिवशी, प्रत्येक सत्रात मी…’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---