पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. ज्यामध्ये पाकिस्तानने पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कराचीमध्ये 26 डिसेंबरपासून सुरू असलेल्या या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने 161 धावा केल्या. आगा सलमान यानेही त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले शतक केले. ज्यामुळे पाकिस्तानने पहिल्या डावात 438 धावसंख्या उभारली. या सामन्यात एक अनोखे दृश्य पाहायला मिळाले, ज्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे.
न्यूझीलंडने प्रत्युत्तरात चांगली फलंदाजी केली. डेवॉन कॉनवे आणि टॉम लॅथम यांनी 183 धावांची सलामी भागीदारी रचली. लॅथम 113 आणि 92 धावा करत बाद झाले. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (28 डिसेंबर) पाकिस्तान जेव्हा क्षेत्ररक्षणासाठी उतरला तेव्हा बाबर आझम याच्याजागी मोहम्मद रिझवान आला, मात्र लोक गोंधळे आहेत की नेमके पाकिस्तानचे नेतृत्व कोण करत आहे?
रिझवान बाबरच्या जागी क्षेत्ररक्षणासाठी आल्याने त्याला वाटले नेतृत्वही त्यालाच मिळाले, मात्र तो या सामन्यात अतिरिक्त खेळाडू म्हणून उतरला. मेरिलबोन क्रिकेट क्लबच्या (24.1.2) नियमानुसार, सब्स्टिट्युट खेळाडू गोलंदाजी किंवा नेतृत्व करू शकत नाही. विकेटकीपिंग करू शकतो, मात्र त्यासाठीही पंचांना विचारणे आवश्यक आहे.
न्यूझीलंडविरुद्ध झाले असे की, अबरार अहमदने न्यूझीलंडचा सलामीवीर कॉनवेला पायचीत केले होते. ज्याला पंच अलीम दार यांनी नाबाद ठरवले. त्यानंतर सरफराज अहमद अबरारसोबत बोलण्यासाठी त्याच्याजवळ गेला तेव्हा रिजवानही तेथे पोहोचला. मग सरफराज आणि रिजवान या दोघांनीही पंचाकडे रिव्ह्यूचा इशारा केला. सरफराजने रिव्ह्यूचा इशारा केल्याने थर्ड अपांयने फलंदाज बाद की नाबाद हे परत पाहिले. कारण बाबरच्या जागी मैदानात सरफराजवर त्यावेळी कर्णधारपदाची जबाबदारी होती.
https://twitter.com/TheRealPCB/status/1607974717004320768?s=20&t=WxxxADy9kTswLaKJUXUIUw
बाबरची तब्येत बिघडल्याने तो तिसऱ्या दिवशी क्षेत्ररक्षणासाठी आला नाही, असे समोर येत आहे. त्याने 280 चेडूत 15 चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने 161 धावा केल्या. सरफराज जवळपास तीन वर्षानंतर पाकिस्तानच्या कसोटी संघात पुमरागमन केले. त्याने या सामन्यात पाकिस्तानच्या पहिल्या डावात 86 धावा केल्या.
न्यूझीलंडने 2021मध्ये पार पडलेल्या सर्वप्रथम खेळल्या गेलेल्या कसोटी चॅम्पियनशीपचा किताब जिंकला होता. त्यासाठी त्यांनी अंतिम सामन्यात भारताचा पराभव केला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
निवड समितीच्या बैठकीत भुवीच्या नावाची चर्चाही नाही? युवा सेनेलाच मिळणार आता संधी
तेजतर्रार अर्शदीप पहिल्याच वर्षी आयसीसी पुरस्कारासाठी नामांकित; हे खेळाडू देणार टक्कर