श्रीलंका संघाने आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात बलाढ्य पाकिस्तानला धूळ चारून विजेतेपद पटकावले. श्रीलंकेचे हे सहावे आशिया चषक विजेतेपद आहे. यापूर्वी 1986, 1997, 2004, 2008 आणि 2014 साली श्रीलंकने आशिया चषक जिंकला होता. यावर्षी पाकिस्तान ट्रॉफी जिंकेल असा सर्वांचाच अंदाज होता, पण तो साफ चुकीचा ठरला. अंतिम सामन्यात त्यांना 23 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. मोहम्मद रिजवानने या सामन्यात अर्धशतक केले, पण तो पाकिस्तानला विजय मात्र मिळवून देऊ शकला नाही. असे असले तरी, भारतीय दिग्गज विराट कोहली याचा खास विक्रम मात्र रिजवानने मोडला.
अंतिम सामन्यात पाकिस्तानला विजयासाठी 171 धावांचे आव्हान मिळाले होते, पण त्यांचा संघ 147 धावांवर सर्वबाद झाला. मोहम्मद रिजवान (Mohammad Rizwan) या सामन्यात पाकिस्तानसाठी सर्वाधिक धावा करणारार खेळाडू ठरला. त्याने 49 चेंडूत 55 धावा केल्या. या अर्धशतकाच्या जोरावर मोहम्मद रिजवान आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने या हंगामात खेळेलेल्या 6 सामन्यांमध्ये 56.20 च्या सरासरीने आणि 117.57 च्या स्ट्राईक रेटने 281 धावा केल्या आहेत.
विराट कोहली (Virat Kohli) या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराटने खेळलेल्या 5 सामन्यांमध्ये तब्बल 92 च्या सरासरीने आणि 147.59 च्या स्ट्राईक रेटने 276 धावा केल्या. भारतीय संघ जर अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला असता, तर विराट सर्वात जास्त धावा करू शकत होता. यादीत तिसऱ्या क्रमांकावर अफगाणिस्तानचा अब्राहिम झद्राद (196) आहे. चौथ्या क्रमांकावर श्रीलंकेचा भानुका राजपक्षे (191) आहे. तसेच पाचव्या क्रमांकावर श्रीलंकेचाच पाथुम निसांका (173) आहे.
गोलंदाजांचा विचार केला, भारतीय संघाचा भुवनेश्वर कुमार आशिया चषकात यावर्षी सर्वात जास्त विकेट्स घेऊ शकला. त्याने या हंगामातील 5 सामन्यांमध्ये 11 विकेट्स घेतल्या. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा वानिंदु हसरंगा आहे, ज्याने या हंगामात 9 विकेट्स घेतल्या आहेत. हसरंगा आशिया चषकात मालिकावीर देखील ठरला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तानी खेळाडू स्वतःच्या चुकीमुळे नाराज; म्हणाला, ‘माफ करा, पराभवाची जबाबदारी…’
हेअरबँड घालून ऑस्ट्रेलियाला दोन-दोन विश्वचषक जिंकून देणारा दुर्लक्षित शिलेदार
पीसीबी अध्यक्षांना पराभव बोचला! भारतीय पत्रकाराशी केले गैरवर्तन; पाहा व्हिडिओ