पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील आशिया चषक 2022 चा अंतिम सामना रविवारी म्हणजेच 11 सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान विराट कोहलीकडून नंबर 1चा मुकुट हिसकावून घेण्याकडे लक्ष देईल.
यंदाच्या आशिया चषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली पहिल्या स्थानावर आहे, तर मोहम्मद रिझवान दुसऱ्या स्थानावर आहे. रिझवानने आज श्रीलंकेविरुद्ध 51 धावा केल्या तर तो कोहलीला मागे टाकून यंदाच्या आशिया कपमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरेल. यंदाच्या आशिया चषकात विराट आत्तापर्यंत विराट कोहलीने सर्वाधिक 276 धावा केल्या आहेत. त्यापाठोपाठ पाकिस्तानच्या मोहम्मद रिजवानने 226 धावा केल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘आम्ही हा सामना जबरदस्तीने खेळलो!’ पहिल्या टी20त पराभवानंतर हरमनप्रीत कौरने केला खुलासा
एकच लक्ष्य, आशिया चषक फक्त; अंतिम सामन्यापूर्वी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमची हुंकार