---Advertisement---

पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानची रेकॉर्डब्रेक कामगिरी, या बाबतीत रिषभ पंतला मागे टाकलं!

On: बुधवार, ऑक्टोबर 16, 2024 1:22 PM
---Advertisement---

मुलतान येथे खेळल्या जात असलेल्या पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवाननं एक खास विक्रम आपल्या नावे केला आहे. पाकिस्तानच्या पहिल्या डावात रिझवाननं 41 धावा केल्या. या दरम्यान त्यानं मोठा पराक्रम केला.

मोहम्मद रिझवान आता 2020 सालापासून कसोटीत सर्वाधिक धावा करणारा यष्टिरक्षक फलंदाज बनला आहे. या बाबतीत त्यानं रिषभ पंतचा विक्रम मोडला. रिझवाननं 2020 पासून कसोटीत एकूण 46 डाव खेळले, ज्यात त्याच्या 1692 धावा आहेत. या दरम्यान त्याची सरासरी 43.38 एवढी राहिली.

विशेष म्हणजे या लिस्टमधील टॉप 3 फलंदाज आशियाई आहेत. भारताचा रिषभ पंत दुसऱ्या क्रमांकावर आहे. पंतनं 2020 पासून कसोटीत 42 डाव खेळले, ज्यात त्यानं 1678 धावा केल्या. या दरम्यान त्याची सरासरी 44.15 एवढी राहिली. तिसऱ्या क्रमांकावर बांगलादेशचा लिटन दास आहे, ज्यानं 2020 पासून कसोटीत 37 डाव खेळले आणि 1348 धावा केल्या.

पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात मोहम्मद रिझवाननं 97 चेंडूंचा सामना करत 41 धावा केल्या. त्यानं आपल्या इनिंगमध्ये 5 चौकार मारले. या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा नवोदित फलंदाज कामरान गुलामनं 118 धावांची शानदार खेळी केली. पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावणारा कामरान हा पाकिस्तानचा 13वा खेळाडू आहे. तर पदार्पणाच्या कसोटीत चौथ्या क्रमांकावर शतक झळकावणारा गुलाम हा पाकिस्तानचा दुसरा आणि जगातील सहावा फलंदाज आहे.

विशेष म्हणजे, कामरान गुलाम याची पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम याच्या जागी निवड झाली आहे. टीम मॅनेजमेंटनं सातत्यानं फ्लॉप ठरत असलेल्या बाबर आझमला संघातून बाहेरचा रस्ता दाखवला, ज्यानंतर गुलामची संघात निवड झाली. आता त्यानं पदार्पणातच शतक ठोकून बाबरच्या अडचणीत वाढ केली आहे.

हेही वाचा – 

रोहित शर्मा पुन्हा होणार मुंबई इंडियन्सचा कर्णधार! जाणून घ्या खास कारण
“मला भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळायचं आहे”, आयपीएल सुपरस्टारचं मोठं व्यक्तव्य
गुरुवर शिष्य भारी! महान बुद्धीबळपटू विश्वनाथन आनंद यांचा शिष्याकडून पराभव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---