अवघ्या २ दिवसांवर आलेल्या आशिया चषक २०२२ साठी सर्व सहभागी संघ संयुक्त अरब अमिरातीकडे रवाना झाले आहेत. भारत, अफनाणिस्तानबरोबर पाकिस्तान संघही युएईला पोहोचला आहे. नेदरलँड ते युएई असा विमान प्रवास करताना पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान हा भारताविरुद्ध चांगले प्रदर्शन करण्यासाठी देवाला साकडे घालताना दिसला आहे. रिझवानचे विमान प्रवासादरम्यान कुरान वाचताना दिसला आहे.
एकीकडे पाकिस्तान संघातील (Pakistan vs India) खेळाडू फोनमध्ये गुंतलेले असताना, रिझवानला (Mohammad Rizwan) कुरान वाचताना पाहून (Mohammad Rizwan Reading Quran) क्रिकेटचाहते त्याचे कौतुक करत आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
आशिया चषकापूर्वी पाकिस्तानचा संघ नेदरलँड दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यात उभय संघात ३ सामन्यांची वनडे मालिका खेळली गेली. ज्यामध्ये पाकिस्तानने ३-० असा विजय मिळवला. या मालिकेनंतर पाकिस्तानचा संघ नेदरलँडवरूनच युएईला रवाना झाला होता. अशात प्रवासादरम्यान पाकिस्तान संघातील इतर खेळाडू मोबाईलवर वेळ घालवत होते. तर काही एकमेकांना बोलण्यात व्यस्त होते. परंतु रिझवान मात्र शांत कुरान वाचण्यात व्यस्त दिसला. तो अतिशय मग्न होऊन कुरान वाचताना दिसतोय.
🛫 Amsterdam to Dubai 🛬
The travel diary of the Pakistan team 🧳#AsiaCup2022 | #BackTheBoysInGreen pic.twitter.com/GfrFKYhdbM
— Pakistan Cricket (@TheRealPCB) August 23, 2022
Masha Allah, i noted all the players are watching on their mobile phones, but Rizwan Bhai is reading Quran Pak, Masha Allah❤🤲 pic.twitter.com/FuQVLa8KHC
— 🇵🇰 Muhammad Noor 🇵🇰 (@Noor_Marriii) August 23, 2022
दरम्यान टी२० स्वरूपात होणाऱ्या आशिया चषकात पाकिस्तानसाठी रिझवान की प्लेयर ठरू शकतो. रिझवानचे टी२० क्रिकेटमधील प्रदर्शन उल्लेखनीय राहिले आहे. त्याने ५६ टी२० सामने खेळताना ५०.३६ च्या सरासरीने १६६२ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या १ शतक आणि १३ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याचा स्ट्राईक रेटही १२८.८४ इतका आहे. रिझवानला भारताविरुद्ध खेळण्याचाही अनुभव आहे. टी२० विश्वचषक २०२१ मध्ये त्याने भारताविरुद्ध पाकिस्तानला सामना जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
आशिया चषक २०२२साठी पाकिस्तान संघ: बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), मोहम्मद वसीम जूनियर ., नसीम शाह, शाहनवाज धानी, उस्मान कादिर आणि मोहम्मद हसनैन.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
दुखापतीमुळे संघाबाहेर झालेला आफ्रिदी संघासोबत युएईत काय करतोय? चाहत्यांनी विचारले तिखट सवाल
भारतीय फलंदाजांना घाबरले पाकिस्तान! एक गोलंदाजी प्रशिक्षक असतानाही दुसऱ्याची केलीय नियुक्ती
सुरेश रैनाला सीएसकेकडून अपेक्षा! आयपीएल २०२३पूर्वी मैदानावर करतोय कसून सराव